Hania Aamir, Mahira Khan सह अनेक पाकिस्तानी कलाकारांची इंस्टा अकाऊट्स वर भारतामध्ये बंदी

काही पाकिस्तानी कलाकारांची भारतात इंस्टा अकाऊंट्स उघडल्यास त्यावर 'Account not available' असा मेसेज येत आहे. Account not available in India याचा अर्थ इंस्टा ग्राम कडून सांगताना कायदेशीर विनंतीचे पालन करत असल्याचे सांगण्यात आला आहे.

India Bans Instagram Accounts of Several Pakistani Actors (Photo Credits: X/@DanishKh4n)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान मधील संबंध तणावाचे झाले आहेत. 26 भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची निर्घुण हत्या केल्यानंतर आता दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आणि पाकिस्तानविरूद्ध कारवाई कडक करताना भारताने काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. सध्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देशातून हद्दपार केल्यानंतर आता सोशल मीडीयातही पाकिस्तानी अकाऊंट्स वर कारवाई सुरू झाली आहे. यापूर्वी भारताने 16 पाकिस्तानी युट्युबर्स चॅनेलवर कारवाई केल्यानंतर आता काही पाकिस्तानी कलाकारांची अकाऊंट्स देखील भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत. या पाकिस्तानी कलाकारांच्या यादीमध्ये Hania Aamir आणि Mahira Khan या कलाकारांचा समावेश आहे.

काही पाकिस्तानी कलाकारांची भारतात इंस्टा अकाऊंट्स उघडल्यास त्यावर 'Account not available' असा मेसेज येत आहे. Account not available in India याचा अर्थ इंस्टा ग्राम कडून सांगताना कायदेशीर विनंतीचे पालन करत असल्याचे सांगण्यात आला आहे. India Bans Shoaib Akhtar’s ‘100mph’ YouTube Channel: भारतात शोएब अख्तरच्या '100mph' युट्यूब चॅनेलवर बंदी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेले मोठे पाऊल.  

भारतात ज्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत त्यात अली जफर, सनम सईद, बिलाल अब्बास, इकरा अझीझ, इम्रान अब्बास आणि सजल अली यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी फवाद खानच्या बॉलिवूड मधील 'अबीर गुलाल' सिनेमाच्या रीलीज वरही बंदी घातल्याचं सांगण्यात आलं आहे. फवाद हा पाकिस्तानी कलाकार असून तो 8-9 वर्षांनंतर बॉलिवूड सिनेमामधून पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार होता. मात्र रीलीजच्या काही दिवस आधी आता या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.

22 एप्रिल दिवशी बैसरण व्हॅली मध्ये दुपारच्या वेळेस 3-4 दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार हा हल्ला पुरूष पर्यटकांवर आणि धर्म विचारून गैर मुसलमानांवर करण्यात आला. या दहशतवाद्यांनी त्यांना इस्लामिक कल्म बोलून दाखवण्यास सांगितली आणि त्यांची ही मागणी पूर्ण न करू शकणार्‍यांना गोळ्या घातल्या. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्याच, द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या संघटनेने घेतली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement