पाकिस्तान कडून रशियाची कोरोनावरील Sputnik लसीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी
अशातच आता रशियाची Sputnik लसीच्या आत्पकालीन वापराला मंजूरी दिली आहे. परंतु प्रश्न असा उपस्थितीत होतो की त्यांना ही लस मिळणार कधी.
भारत, पाकिस्तान, युके, चीनसह जगातील अन्य देशात लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. परंतु भारताच्या बाजूचा देश पाकिस्तान (Pakistan) यांना लस कोणार देणार याच गोष्टीमुळे बुचकळ्यात पडला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने चीनने तयार केलेली कोरोनावरील लस सिनोफार्मा त्यांना मिळणार असल्याचे म्हटले होते. अशातच आता रशियाची Sputnik लसीच्या आत्पकालीन वापराला मंजूरी दिली आहे. परंतु प्रश्न असा उपस्थितीत होतो की त्यांना ही लस मिळणार कधी.
पाकिस्तानची बेवसाईट डॉन यांच्यानुसार, देशातील सरकारने रशियाची कोविड19 वरील लस स्पुटनिकच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. ही तिसरी लस आहे ज्यासाठी पाकिस्तानने मंजूरी दिली आहे. पण येथे लसीकरणाची मोहिम सुरु झालेली नाही. या उलट भारतात 3 जानेवारीला दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असून 16 जानेवारी पासून लसीकरण सुरु झाले आहे. ऐवढेच नाही तर 20 जानेवारी पासून भारताने बाजूच्या देशांना सुद्धा लस पाठवण्यास सुरुवात केली आहे.(पाकिस्तानला भारताकडून Covishield लस मिळेल अशी अपेक्षा पण 'या' कारणामुळे ती थेट मिळणार नाही)
Tweet:
याआधी पाकिस्तानच्या ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीकडून ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका यांच्या कोविड19 च्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. पाकिस्तानने जरी या लसीच्या वापरासाठी मान्यता दिलीय पण एस्ट्राजेनेका वॅक्सिन ही भारतातील सीरम इंस्टिट्युट मध्ये तयार केली जात आहे. त्याचसोबत पाकिस्तानला ही लस द्विपक्षीय करारानुसार थेट मिळू शकणार नाही आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान जागतिक आरोग्य संगठनेच्या कोवॅक्स व्यवस्थेअंतर्गत भारतात तयार करण्यात येणारी लस मिळवू शकतो. या व्यतिरिक्त पाकिस्तान पुढील आठवड्यात चीनच्या सिनौफार्मा लसीला सुद्धा परवानगी देऊ शकतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या आरोग्या विषयावरील विशेष सहाय्यक डॉ. फैसल सुल्तान यांनी असे म्हटले की, आम्ही एस्ट्राजेनेका लसीला मंजूरी दिली असल्याचे समोर आले होते.