IPL Auction 2025 Live

Padma Awards 2021: भारतामधील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा; Shinzo Abe, S P Balasubramaniam सह 7 जण पद्म विभूषणने सन्मानित (See Full List)

1954 पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती

SP Balasubramanyam and Shinzo Abe (Photo Credits: Twitter)

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून प्रदान केला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 'पद्म पुरस्कारां'ची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. 1954 पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. या पुरस्कारांना पद्म विभूषण (Padma Vibhushan), पद्मभूषण (Padma Bhushan) आणि पद्मश्री (Padma Shri) अशा तीन प्रकारात विभागले गेले आहे. अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी सात जणांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, गायक एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.

सात लोकांना पद्मविभूषण, दहा जणांना पद्मभूषण आणि 102 व्यक्तींना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा: Indian Railways: आतापासून दर दिवसा रेल्वे रुळावर धावणार 1138 एक्सप्रेस- रेल्वे मंत्रालय)

पद्म विभूषणने सन्मानित –

दरम्यान, भारतरत्न पुरस्कारानंतरचे पद्म पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना केंद्र सरकारतर्फे गौरवण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्रालयाने विशिष्ट क्षेत्रात/ शिस्त, शौर्य अपवादात्मक कामगिरीबाबत पुरस्कारासाठी निवडल्या गेलेले पोलिस अधिकारी, संरक्षण कर्मचारी आणि मुलांची एक यादी प्रसिद्ध केली. या पुरस्कारांमध्ये पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कार, राष्ट्रपती पोलिस पदक, सुधारात्मक सेवा पुरस्कार, पंतप्रधान चाइल्ड अवॉर्ड, राष्ट्रपति अग्निशमन पदक, गृह रक्षक आणि नागरी संरक्षण सन्मान आणि जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे.