संतापजनक! शिबिरात ट्रान्सजेंडरला रक्तदान करण्यास केली मनाई; Kolkata येथील धक्कादायक घटना

या विषयावर बोलताना मेडिकल बँक कोलकाताचे सेक्रेटरी डी आशिष यांनी सांगितले की, ते राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करतात परंतु अनेकदा असे लक्षात आले आहे की, शिबिरातील अधिकारी आणि इतर सदस्यांकडून ट्रान्सजेंडर्सकडे दुर्लक्ष केले जाते.

Blood Donation (Photo Credits: Pixabay)

एका संतापजनक घटनेत कोलकाता (Kolkata) येथील एका ट्रान्सजेंडरला (Transgender) बनहुघली (Bonhughly) येथील रक्तदान शिबिरात (Blood Donation Camp) रक्तदान करण्यास मनाई केली आहे. एचआयव्ही (HIV) च्या उच्च जोखमीमुळे रक्तदान करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर आरोग्य कर्मचार्‍याने ट्रान्सजेंडरला रक्तदान करण्यास परवानगी दिली. मात्र आता या घटनेने ट्रान्सजेंडरला रक्तदान करण्यापासून का रोखले जाते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशा घटनेवर आपले मत व्यक्त करताना असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राइट्स (APDR) चे सरचिटणीस रणजीत सुर यांनी एएनआयला सांगितले की, ‘मी अशा प्रकारच्या घटनेचे समर्थन करत नाही. माझ्या दृष्टिकोनातून हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. या घटनेनंतर, मी या प्रकरणाची चौकशी केली आणि मला आढळले की राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेमध्ये एक मार्गदर्शक तत्व आहे की, ट्रान्सजेंडर, गे किंवा लेस्बियन यांना रक्तदान करण्याची परवानगी नाही. परंतु यामागील कारण स्पष्टपणे नमूद केलेले नाही आणि ते अवैज्ञानिक आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘रक्तदान शिबिरात सहभागी असलेल्यांसह विविध लोकांना या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती नाही आणि नैतिक आधारावर एखाद्याला रक्तदान करण्यापासून प्रतिबंधित करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. रक्तदान हे एक सामाजिक कर्तव्य आहे आणि लिंग-ओळखांच्या आधारावर, एखाद्याला रक्तदान करण्यापासून प्रतिबंधित करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन. आम्ही हा मुद्दा गंभीरपणे मांडणार आहोत.’ (हेही वाचा: Amit Shah on Sedition Law: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा; IPC, CrPC मध्ये बदल करण्यासाठी अमित शहांनी सादर विधेयक)

या विषयावर बोलताना मेडिकल बँक कोलकाताचे सेक्रेटरी डी आशिष यांनी सांगितले की, ते राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करतात परंतु अनेकदा असे लक्षात आले आहे की, शिबिरातील अधिकारी आणि इतर सदस्यांकडून ट्रान्सजेंडर्सकडे दुर्लक्ष केले जाते. कलकत्ता विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मानबी बंदोपाध्याय यांनी एएनआयला सांगितले की, केंद्र किंवा राज्य सरकारचे कोणतेही विशिष्ट नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे नाहीत जी ट्रान्सजेंडर्सना रक्तदान करण्यापासून प्रतिबंधित करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif