Paneer Sandwich मागवले Chicken मिळाले; शाकाहारी महिलेने ठोकला 50 लाख रुपयांचा दावा; जाणून घ्या प्रकरण
ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) करणाऱ्या कंपनीकडून घडलेल्या चुकीबद्दल गुजरातमधील एका शाकाहारी महिलेने (Vegetarian Woman) चक्क 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे. अहमदाबाद (Ahmedabad) येथील निराली नामक महिलेने सायन्स सिटी येथील तिच्या कार्यालयातून जेवणासाठी ऑर्डर दिली. 'पिक अप मील बाय टेरा' (Pickup Meals by Terra) या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन मागवलेल्या जेवणामध्ये तिने पनीर टीक्का सँडविच (Paneer Sandwich) ऑर्डर केली होती. पण,महिलेला भेटलेल्या डिलिव्हरीमध्ये तिच्या ऑर्डरऐवजी चिकन सँडविच (Chicken Sandwich) मिळाले. ज्यामुळे महिलेचा संताप झाला आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीला तिने कायदेशीर कचाट्यात पकडले.
शुद्ध शाकाहारी महिलेने अनावधानाने खाल्ले चिकन
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कट्टर शाकाहारी असलेल्या निरालीने 3 मे रोजी सायन्स सिटी येथील तिच्या कार्यालयातून ऑर्डर दिली. जेवनाचे पार्सल ऑनलाईन आल्यानंतर तिने ते उघडले तेव्हा तिला तिला आढळले की, तिच्या सँडविचमधील पनीर विलक्षणपणे टणक आहे. ते सोया असल्याचा संशय घेऊन निरालीने काही घास खाल्ले. पण तिला काहीच वेळात लक्षात आले की, हा टणक पदार्थ पनीर किंवा सोया नव्हे तर चिकन आहे. जे आपण आयुष्यात केव्हाही खाल्ले नाही. शुद्ध शाकाहारी असताना ऑनलाईन फूड डिलीव्हरी करणाऱ्या कंपीनकडून झालेल्या चुकीमुळे तिला चिकन खावे लागल्याने महिला प्रचंड संतापली. (हेही वाचा, 5 Best Sprouts Dishes: पौष्टिक आहार, कोणत्याही ऋतूमध्ये चालणारे कडधान्यापासून बनवलेले 5 सोपे पदार्थ; घ्या जाणून)
संतप्त महिलेकडून उप आरोग्य अधिकाऱ्याला पत्र
सांतपालेल्या निराली नावाच्या महिलेने भोजनालयाच्या विरोधात तातडीने तक्रार दाखल केली आणि त्यामुळे झालेला त्रास आणि मनस्ताप याबाबत भरपाई मागितली. तिने औपचारिकपणे अहमदाबाद महानगरपालिकेच्या उप आरोग्य अधिकाऱ्याला पत्र लिहून तिच्या तक्रारीची माहिती दिली. अन्न विभागाने रेस्टॉरंटला ₹ 5,000 दंड ठोठावला. मात्र, निरालीचे अन्न विभागाच्या कारवाईने समाधान झाले नाही. तिने घडल्या प्रकाराबाबत नुकसानभरपाई मिळावी यासाठी ग्राहक न्यायालयात कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Dogbite Victims To Get Compensation: आता कुत्रा चावल्यावर सरकारला द्यावी लागणार भरपाई; दाताच्या प्रत्येक खुणेसाठी मिळणार 10,000 रुपये, न्यायालयाचे निर्देश)
रेस्टॉरंटकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
कंपनीकडून झालेली चूक, अन्न विभागाने रेस्टॉरंटला ठोठावलेले दंड याबाबत बोलताना महिलेने इंडिया टुडेला सांगितले की, भरपाईची कोणतीही रक्कम तिला झालेला आघात कमी करू शकत नाही. ₹ 5,000 दंड पुरेसा नाही आणि मी ग्राहक न्यायालयात जाईन. त्यामुळेच मनस्तापाची परतफेड म्हणून आपण ₹ 50 लाख रुपयांची मागणी करत आहोत. महिलेने सांगितले की ती न्याय मिळवण्यासाठी ग्राहक न्यायालयात जाईल. दरम्यान, या घटनेबाबत रेस्टॉरंटकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
महिलेने केलेली नुकसानभरपाईची मागणी आणि निवडलेला मार्ग यावरुन ती इंटरनेट आणि खास करुन सोशल मीडियावर टीकेची धनी ठरली आहे. तरीही महिला आपल्या मागणीवर ठाम असून तीने म्हटले आहे की, आपण ग्राहकांचे हक्क आणि जनजागृतीसाठी काम करतो आहोत. जे लोक अशा अनुभवातून जात आहेत. त्यांना लढण्याचे बळ मिळावे असाही आपला प्रयत्न असल्याचे ती सांगते.