Opposition Meeting: सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी राहणार उपस्थित
आज (शुक्रवार, 20 ऑगस्ट) पार पडणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस (Congress) पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित केली आहे. आज (शुक्रवार, 20 ऑगस्ट) पार पडणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित राहणार आहेत. या शिवाय तामिळनाडू आणि झारखंड राज्यांसह काँग्रेस शासित इतर राज्यांचेही मुख्यमंत्री या मिटींगला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही बैठक डिजिटल प्रणालीद्वारे पार पडणार आहे. ही बैठक कोणत्या मुद्द्यांवर आयोजित करण्यात आली आहे याबाबतचा तपशील बाहेर आला नाही. मात्र, केंद्रातील सत्ताधारी आणि भाजपला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते.
देशातील विरोधी पक्ष हे राष्ट्रीय पातळीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तोडीस तोड विरोध करण्यासाठी एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पेगसास प्रकरण, शेतकरी आंदोलन, महागाई अशा एक नाअनेक मुद्द्यांवरुन एकजूट दाखवत सरकारवर प्रहार केला. यावेळी राहुल गांधी हे विरोधकांची मोट बांधताना नजरेस आले.
सोनिया गांंधी यांच्यासोबत पार पडणाऱ्या डिजिटल बैठकीस , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तमिलनाडुटे मुख्यमंत्री एमके स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह इतरही विरोधी पक्षांना निमंत्रीत करण्यात आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगसास प्रकरण, शेतकरी आंदोलन, महागाई अशा एक नाअनेक मुद्द्यांवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला घेरल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षांची व्यापक स्वरुपावर बैठक पार पडत आहे. (हेही वाचा, Sharad Pawar On 102 Constitutional Amendment Bill 2021: केंद्र सरकारने केलेली घटनादुरूस्ती OBC समाजाची फसवणूक; जातिनिहाय जनगणना, 50% आरक्षणाची अट काढण्याची मागणी)
दरम्यान, या बैठकीचा अजेंडा अद्याप तरी पुढे आला नाही. परंतू, विरोधी पक्षांची एकजून भक्कम करणे तसेच केंद्र सरकारवर दबाव वाढविण्यासाठी विचार-विनिमय करणे या बैठकीचे उद्दीष्ट असू शकते अशी सूत्रांची माहिती आहे. अफगानिस्तानमध्ये निर्माण झालेली परिस्थीती आणि पूर्वेकडील देशांमध्ये घडत असलेल्या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते.