Loan Restructuring संदर्भात RBI ने केली मोठी घोषणा! 1 मार्च 2020 पर्यंतचे स्टँटर्ड लोनच रिस्ट्रक्चरिंगसाठी पात्र
त्यानंतर आज RBI ही मोठी घोषणा केली आहे.
मार्च महिन्यात देशात घुसलेल्या कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus) महाभयाण विषाणूने संपूर्ण देश घुसळून टाकला आहे. या व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांवर बेरोजगारीची कु-हाड आली आहे. यामुळे घर किंवा अन्य कारणांसाठी बँकेकडून लोन काढलेल्या सामान्य नागरिकांवर मोठे संकट आले आहे. अशा वेळी RBI Loan Restructuring च्या बाबतीत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 1 मार्च 2020 कोणत्याही डिफॉल्टमध्ये न आलेल्या स्टँडर्ड लोनला (Standard Loan) ऑगस्टमध्ये आलेल्या कोरोना महामारीशी संबंधित स्कीम अंतर्गत रिस्ट्रक्चरिंग (Loan Restructuring) साठी पात्र मानण्यात येणार आहे असे सांगितले आहे.
याआधी सरकारी बँक SBI सांगितेल होते की, 1 मार्च 2020 ला बँकेच्या बुक्समध्ये असलेल्या खात्यांनाच लोन रिस्ट्रक्चरिंगची सुविधा मिळेल. त्यानंतर आज RBI ही मोठी घोषणा केली आहे.
या लोन रिस्ट्रक्चरिंग प्लानसाठी तुम्ही योग्य आहात की नाही यासाठी तुम्हाला तुमच्या रिकैलकुलेटेड EMI खर्च, लोन रिपेमेंट पिरियड आणि संभावित व्याज याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
त्यामुळे प्रत्येक कर्जदाराने लोन रिस्ट्रक्टरिंगविषयी व्यवस्थित माहिती करून घेतली पाहिजे. त्यानंतरच याचा विचार केला पाहिजे. कोरोना महामारीच्या काळात आपल्यावर आलेले आर्थिक संकट काही अंशी तरी कमी होत आहे का याची खात्री करुन घ्या.
काही दिवसांपूर्वी RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी घेतलेल्या बैठकीत व्याज दरांत काही विशेष बदल करण्यात आले नसल्याचे सांगितले. आरबीयआयच्या मॉनिटरी पॉलिसी (RBI Monetary Policy) ने व्याज दरात काही विशेष बदल केले नेसून EMI मध्येही विशेष सवलत देण्यात आलेली नाही. या पत्रकार परिषदेत 2021 मध्ये GDP मध्ये 9.5% घसरण होण्याची शक्यता आहे असे शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.