One Nation One Ration Card: देशभरातील सुमारे 67 कोटी जनता येणार 'वन नेशन - वन राशन कार्ड' कक्षेत
निर्मला सीतारमण यांनी कालही या पॅकेजबाबत पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून माहिती दिली होती. आजही त्यांनी कालप्रमाणेच पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
Atma Nirbhar Bharat Abhiyan: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आल आहे. या पॅकेजबाबत केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (गुरुवार, 14 मे 2020) माहिती दिली. निर्मला सीतारमण यांनी या वेळी वन नेशन वन रेशन कार्ड या उपक्रमाची माहिती दिली. निर्मला सीतारमण यांनी कालही या पॅकेजबाबत पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून माहिती दिली होती. आजही त्यांनी कालप्रमाणेच पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, 23 राज्यांमध्ये 67 कोटी लाभार्थींना वन नेशन वन रेशन कार्ड प्रणालीचा फायदा होईल. ही योजना सार्वजनिक वितरणाशी जोडली जाईल. तसेच त्याचा फायदा देशातील 83 टक्के जनतेला होईल. सीतारमण यांनी सांगितले की, 23 राज्यांमधील 67 कोटी शिधापत्रीका धारकांना ( जे सुमारे PDS लोकसंख्येच्या 83% आहेत) ऑगस्ट 2020 पर्यंत राष्ट्रीय पोर्टेब्लिटीच्या कक्षेत आणण्यात येईल. तसेच, मार्च 2021 पूर्वी 100% नॅशनल पोर्टेब्लिटी मिळवली जाईल. (हेही वाचा, Atma Nirbhar Bharat Abhiyan: केंद्र सरकार मजुरांना 2 महिने देणार मोफत राशन; कार्डची आवश्यकता नाही)
एएनआय ट्विट
पुढे बोलताना निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, स्थलांतरीत मजुरांना दोन महिन्यांपर्यंत राशन मोफत मिळेल. विविध राज्यांमध्ये असले मजूर NFSA किंवा राज्याचे कार्डधारक नाहीत. अशा मजूरांनाही दोन महिन्यांपर्यंत पाच किलोग्राम अन्न प्रति व्यक्ती दिले जाईल. अर्थमंत्रालयाने सांगितले की, मजूरांना राशन देण्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.