Reason Of Odisha Train Accident: का घडला बालासोर रेल्वे अपघात? नेमकं कारण आलं समोर, केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी दिली माहिती

रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण शोधून काढले आहे. हा अपघात मानवी चुकांमुळे घडला आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील (Electronic Inter Locking System) बदलामुळे हा अपघात, घडल्याचे ते म्हणाले.

Railways Minister Ashwini Vaishnaw. (Photo credits: Twitter/ANI)

ओडिशा ट्रेन दुर्घटना अवघ्या देशाचे काळीज पिळवटून गेली. आतापर्यंत या घटनेत तब्बल 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हा अपघात झालाच कसा? असा प्रश्न देशभरातून विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर पुढे आले आहे. रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण शोधून काढले आहे. हा अपघात मानवी चुकांमुळे घडला आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील (Electronic Inter Locking System) बदलामुळे हा अपघात, घडल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही सध्या वाहतूक सेवा सुरळीत करण्यावर आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यावरच आम्ही सर्व लक्ष केंद्रीत केल्याचे ते म्हणाले. आणखी माहिती देताना अश्वीनी वैष्णव म्हणाले, मदत आणि बचाव कार्यातील पथकाने बुलडोझर आणि क्रेनच्या खराब झालेले रेल्वे ट्रेक आणि डबे बऱ्यापैकी ठिक केले आहेत. आहेत जेणेकरून पूर्व आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मुख्य ट्रंक लाईनवरील रेल्वे सेवा पूर्ववत करता येईल. (हेही वाचा, Odisha Train Tragedy: ओडिशा ट्रेन दुर्घटनेची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल)

प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की, बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन वेगवेगळ्या गाड्यांचा अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात या दोन पॅसेंजर गाड्यांचे तब्बल 17 डबे रुळावरून घसरले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, रेल्वे दुर्घटनेतील जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी एम्स आणि इतर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर आणि तज्ञांचे एक पथक आयएएफच्या विशेष विमानाने भुवनेश्वरला रवाना झाले आहे.

एका बाजूला सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले, "जेव्हा रेल्वेमंत्री वारंवार सांगतात की आमची यंत्रणा पूर्णतः परीपूर्ण आहे आणि कोणतीही गंभीर दुर्घटना घडू शकत नाही, तर हे कसे घडले? ते (अश्विनी वैष्णव) ओडिशा केडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत, जिथे ही शोकांतिका घडली आहे. अशा रेल्वे अपघातात लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे उदाहरण आहे. मग अश्विनी वैष्णव राजीनामा का देत नाहीत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now