Coronavirus Lockdown ओडिशा मध्ये 30 एप्रिलपर्यंत; संचारबंदी वाढवणारे ठरले भारतातील पहिलं राज्य
भारतामध्ये कोरोना व्हायरस धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र हा लॉकडाऊन ओडिशा सरकारकडून 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरस धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र हा लॉकडाऊन ओडिशा सरकारकडून 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन वाढवणारं ओडिशा हे देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे. दरम्यान ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (Odisha CM Naveen Patnaik) यांनी 30 एप्रिलपर्यंत राज्यात रेल्वे आणि विमान वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सार्या शाला 17 जून पर्यंत बंद राहतील अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. सध्या ओडिशामध्ये 42 कोरोनाबधित रूग्ण आहेत. Coronavirus: Lockdown संपणार की वाढणार? 14 एप्रिल नंतर सरकारचा विचार काय?
ओडिशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी विविध स्तरांवर काम केले जात आहे. नुकतेच राज्यात 1,620 आयुष कर्मचार्यांच ं संघटन बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये शिकाऊ डॉक्टर्स, नर्स यांचा समावेश आहे. त्यांना कोव्हिड 19 चा सामना करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
ANI Tweet
पंताप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 ला भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा करताना social distancing या एकाच शस्त्राच्या मदतीने आपण कोरोना व्हायरस विरूद्धच्या युद्धामध्ये सध्या तग धरून राहून शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान त्यावेळेस घराच्या उंबरठ्याबाहेर 3 आठवड्यांसाठी लक्ष्मणरेखा आखून घ्या असं म्हणत जर हे 21 दिवस भारतीयांनी लॉकडाऊन काटेकोरपणे पाळले नाही तर आपण 21 वर्ष मागे जाण्याचा धोका बोलून दाखवला होता.
भारतामध्ये आज कोरोनाबाधितांचा आकडा 5734 पर्यंत पोहचला आहे. त्यापैकी 5095 जणांवर विविध रुग्णलयांमध्ये उपचार सुरू असून 166 लोकांचा बळी गेला आहे तर 473 लोकं कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)