COVID-19 च्या पार्श्वभूमीवर नवीन पटनाईक यांची जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी संबंधित कामांना स्थगिती देण्याची पंतप्रधानांकडे मागणी

सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले असून अशात जनगणना करणे हे धोक्याचे आहे.

Odisha Cm And PM (Photo Credits: PTI)

कोविड-19 चे भारतात पसरत चाललेले जाळे लक्षात घेता देशातील सर्व जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले असून अशात जनगणना करणे हे धोक्याचे आहे. या कामासाठी जवळपास 30 लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी जनगणनेचे काम करतात. सद्य परिस्थितीमुळे त्यांच्या जीवास यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या असून जनतेसाठी शक्य तितकी खबरदारी घेत आहे. मात्र यामध्ये त्या संबंधित कर्मचा-यांची सुरक्षा ही तितकीच महत्वाची आहे. ही गोष्ट लक्षात घेता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी यावर्षीच्या NPR सर्वे ला (जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Coronavirus In Maharashtra: पहिली ते आठवी च्या परीक्षा रद्द; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

यासंदर्भातील पत्र लिहून जनगणनेचे काम करणा-या कर्मचा-यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली असून NPR अपडेटिंग चे पहिले शेड्यूल पूर्ण तयार केले आहे. 1 एप्रिल पासून हे काम सुरु होईल. Coronavirus ची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत जनगणनेच्या कामाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी नवीन पटनाईकांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच सीओव्हीआयडी-19 (COVID-19) संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत या कालावधीत 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) आयोजित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने जनतेसाठी आयोजित केलेला कर्फ्यू. जनता कर्फ्यू काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे. समाजात जाऊ नये. जे केवळ अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक आहेत त्यांनीच केवळ घराबाहेर पडावे. हे आपल्या आत्मसन्माची गोष्ट आहे. आत्मसन्मान ही देशभक्तीच आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.