Odisha Bull Attack: ओडिशा जाजपूर देवडा येथे भटक्या गुरांचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू
त्याने काठीने दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु बैल हिंसक झाला आणि त्यांना मारले.
ओडिशात (Odisha ) अनेक महिन्यांपासून गावकऱ्यांना दहशत माजवणाऱ्या एका भटक्या बैलाने (Bull Attack) मंगळवारी धर्मशाळा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या देवडा गावात एका 65 वर्षीय शेतकऱ्याचा बळी घेतला. आलेखचंद्र मल्लिक हा शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना गायीचा पाठलाग करणारा बैल त्यांच्या जमिनीवर शिरला. त्याने काठीने दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु बैल हिंसक झाला आणि त्यांना मारले. आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बैलाने त्याच्यावर हल्ला करणे थांबवले नाही. (हेही वाचा - Uttarakhand News: वनविभाग कर्मचारींच्या इलेक्ट्रॉनिक वाहनाचा भीषण अपघात, चार जणांचा जागीत मृत्यू,१ बेपत्ता)
या हल्ल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला धर्मशाळा सीएचसीमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेऊन अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. या ठिकाणी बैलाने गेल्या काही महिन्यांत किमान 15 जणांना जखमी केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
गेल्या आठवड्यात 3 जानेवारीला बालासोरमधील निलागिरी येथे एका जंगली अस्वलाने दोघांना चावा घेतला आणि त्यांना गंभीर जखमा झाल्या. तनाका गावातील लक्ष्मीधर नायक आणि बौनसाबनिया येथील सिबाशंकर सिंग या पीडितांना उपचारासाठी निलगिरी सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या घटनेची माहिती निलागिरी परिक्षेत्राच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.