Shehbaz Sharif यांच्या काश्मीर वक्तव्यावर भारताचं पाकिस्तानला प्रत्युत्तर, संयुक्त राष्ट्रांच्या सभेत भारताचे सचिव मिजितो विनिटोंनी घेतला खरपूस समाचार

संयुक्त राष्ट्रांच्या भर सभेत भारताचे सचिव मिजितो विनिटो यांनी पाकला ठणकावून प्रत्यूत्तर दिलं आहे.

पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा एकदा भारतविरोधी (India) तिरस्कारी वक्तव्य केलं आहे. काल पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सभेत (UNGA) पाकिस्तानचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांची काश्मीरचा (Kashmir) मुद्दा उचलून धरला आणि आपल्या सर्व शेजाऱ्यांसोबत शांतता हवी असल्याचा दावा करत भारतावर (India) बिनबूडाचे आरोप केले. शाहबाज शरीफांच्या (Shehbaz Sharif) या वक्तव्याची आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर चांगलीचं चर्चा सुरु आहे. पण भारताने (India) देखील पाकिस्तानच्या (Pakistan) या टोलेबाजीचा खरपूस समाचार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UNGA) भर सभेत भारताचे सचिव मिजितो विनिटो (Mijito Vinito) यांनी पाकला ठणकावून प्रत्यूत्तर दिलं आहे. सचिव मिजितो (Mijito Vinito) म्हणाले भारतावर (India) खोटे आरोप करण्यासाठी पाक पंतप्रधानांनी या संमेलनाचे व्यासपीठ निवडले हे खेदजनक आहे. तसेच स्वत:च्या देशातील सुरु असलेला गोंधळ लपण्यासाठी भारत विरुध्द हे वक्तव्य केल्याचं मिजितो म्हणाले.

 

मागील काही काळात भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा (Terrorist Attack) दाखला देत सचिव मिजितो यांनी पाकिस्तानचा चांगलाचं सुनावलं आहे. काश्मिरचा वादग्रस्त मुद्दा खरचं सुटू शकतो पण त्यासाठी सीमेपलीकडील दहशतवाद, सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या लोकांसह स्वच्छ होईल तसेच पाकिस्तानात अल्पसंख्याकांचा छळ होणार नाही तेव्हा शहबाज शरिफांचा सल्ला खरा ठरु शकेल असा टोला भारतीय सचिवांनी पाकिस्तानला लगावला आहे.

(हे ही वाचा:- Mohan Bhagwat Met AIIO Chief Umer Ahmed Ilyasi: मुस्लिम धर्मगुरु म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत हे ‘राष्ट्रपिता’!)

 

तरीही संयुक्त राष्ट्राच्या (UNGA) सभेत भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे आशियाई दोन देश (Asian Countries) केद्रस्थानी राहिले. आपसातील वादमुळे आता आंतराष्ट्रीय (International) स्तरावर या वादाच्या चर्चा होतं आहे.  भारत पाकिस्तान मधील वादावर नेमका कधी आणि काय तोडगा निघणार हा कधीही न संपणाऱ्या वादापैकी एक मुद्दा आहे. तरी भारत विरुध्द पाकिस्तान या संयुक्त राष्ट्राच्या सभेतील टोलेबाजीनंतर आंतराष्ट्रीय स्तरावर काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.