Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी भारतीय शेअर बाजार राहणार खुला, NSE आणि BSE वर 1 फेब्रुवारी रोजी करता येणार व्यापार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) येत्या शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प (Union Budget 2025) संसदेत सादर करतील. मात्र, या दिवशी शनिवार हा साप्ताहीक सुट्टीचा वापर असल्याने भारतीय शेअर बाजार (Stock Market) सुरु राहणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister ) येत्या शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा नव्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Union Budget 2025) संसदेत सादर करतील. मात्र, या दिवशी शनिवार हा साप्ताहीक सुट्टीचा वापर असल्याने भारतीय शेअर बाजार (Stock Market) सुरु राहणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि बॉम्बे शेअर बाजार (BSE) यांनी शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी पूर्ण व्यापार सत्रे चालवण्याची घोषणा केली आहे. परिणामी या दिवशी बाजार सुरु असणार आहे.
या आधीच्याघटनांची पुनरावृत्ती
दोन्ही एक्सचेंजनी सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार पुष्टी केली की, थेट व्यापार नियमित बाजाराच्या वेळेनुसार सुरू राहील. या आधीही 1 फेब्रुवारी 2020 आणि 28 फेब्रुवारी 2015 या दिवशी शनिवार होता आणि अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे त्या दिवशीही शेअर बाजार सुरुच राहिला होता.
अर्थसंकल्पीय दिवसाच्या व्यापारासाठी बाजाराच्या वेळा
बीएसई आणि एनएसई उघडण्याची वेळ: सकाळी 9:15 ते दुपारी 3:30
कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटः ट्रेडिंग संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत वाढवली
पूर्व-बाजार सत्रः 9:00 AM ते 9:08 AM
सेटलमेंट निर्बंधः सेटलमेंटच्या सुट्टीमुळे 'टी0' सत्र उपलब्ध होणार नाही
बाजारासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे महत्त्व
केंद्रीय अर्थसंकल्प हा एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक दस्तऐवज आहे. जो सरकारची वित्तीय रणनीती, आर्थिक सुधारणा आणि क्षेत्रनिहाय वाटपाची रूपरेषा स्पष्ट करतो. हे देशाच्या आर्थिक स्थितीचे आणि गुंतवणुकीच्या दृष्टीकोनाचे प्रमुख सूचक म्हणून काम करते. अर्थसंकल्पाच्या घोषणांसाठी शेअर बाजाराचा प्रतिसाद अनेकदा गुंतवणूकदारांच्या भावना आणि क्षेत्रीय कलांवर प्रभाव टाकतो.
विविध उद्योगांवर होणाऱ्या परिणामाचा अंदाज घेण्यासाठी कर आकारणी धोरणे, पायाभूत खर्च आणि वित्तीय तुटीचे अंदाज यासह अर्थसंकल्पातील तरतुदींवर बाजार विश्लेषक बारकाईने लक्ष ठेवतात. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात लक्षणीय अस्थिरता निर्माण झाली झाल्याचे या आधी पाहायला मिळाले आहे.
वाचकांसाठी सूचना: तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते आणि गुंतवणुकीच्या सूचना त्यांच्या स्वतःच्या आहेत आणि त्यामध्ये 'लेटेस्टली' ची मते प्रतिबिंबित होत नाहीत. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित वित्तीय व्यावसायिकांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

