Amritsar Shocker: खंडणी देण्यास नकार दिल्याने अमृतसरमध्ये NRI वर गोळीबार, रुग्णालयात मृत्यूशी झूंज सुरू (Watch Video)
अमृतसर येथे गुंडांनी एका एनआरआयच्या घरात घुसून त्याच्यावर बायका-मुलांसमोर गोळीबार केला. पीडित हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी आला होता. गुंडांनी त्याची संपत्ती पाहून खंडणी मागितली. त्याने पैसे देण्यास नकार देताच गोळीबार झाला.
Amritsar Shocker : पंजाबमधल्या अमृतसरमध्ये काही गुंडांनी एका एनआरआयवर त्याच्या घरात घुसून गोळीबार(Bullets Fired) केला. या गोळीबारात सुदैवाने एनआरआय (NRI Firing)बचावला आहे. मात्र, तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जखमी व्यक्तीची मुले वडिलांना मारू नका असं हातापाया पडून मुलं विनवणी करताना दिसत आहेत. पण गुंडांनी बायको मुलांसमोर त्या एनआरआय व्यक्तीवर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. (Pune Firing: भोरमध्ये ठो ठो...; लष्कराच्या निवृत्त ब्रिगेडियरचा गावकऱ्यांशी वाद, रागाच्या भरात हवेत गोळीबार (Watch Video))
गोळीबारात सुखचैन सिंह हे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खंडणी मागण्यासाठी हे गुंड सुखचैन यांच्या घरात घुसले असण्याची प्राथमिक शकत्या पोलिसांनी वर्तवली आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारात बाईकवरुन आलेले दोन हल्लेखोर घरात घुसले. त्यांनी कुटुंबियांशी आधी बातचित केली त्यानंतर त्यांच्या कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद झाला.(Firing During Party in America: अमेरिकेत पार्टीदरम्यान जोरदार गोळीबार, अनेकांचा मृत्यू; गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल)
खंडणी देण्यास नकार दिल्याने NRI वर गोळीबार
ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਅਮਨ ਕਾਨੂੰਨ ਦੀ ਸਥਿਤੀ ਬਿਲਕੁਲ ਵਿਗੜ ਚੁੱਕੀ ਹੈ, ਪੰਜਾਬ ਦੇ ਅੱਜ ਦੇ ਹਾਲਾਤ ਦੇਖ ਬਹੁਤ ਦੁੱਖੀ ਹਾਂ, ਅੱਜ ਸਵੇਰੇ ਦੁਬੁਰਜੀ, ਸ੍ਰੀ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਸਾਹਿਬ ਦੇ NRI ਵੀਰ ਸੁਖਚੈਨ ਸਿੰਘ ਦੇ ਘਰ ਵੜ ਕੇ ਬਦਮਾਸ਼ਾਂ ਨੇ ਸ਼ਰੇਆਮ ਗੋਲੀਆਂ ਚਲਾ ਦਿੱਤੀਆਂ।
ਮਾਤਾ ਜੀ ਆਪਣੇ ਪੁੱਤ ਅਤੇ ਮਾਸੂਮ ਬੱਚਾ ਆਪਣੇ ਪਿਤਾ ਨੂੰ ਬਚਾਉਣ ਲਈ ਹੱਥ ਜੋੜ ਰਹੇ ਹਨ… pic.twitter.com/WJbQws2SAL
अचानक तिघांमधल्या एकाने स्वत:जवळची बंदूक काढली आणि सुखचैन यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या घटनेने घरात आरडा-ओरडा सुरु झाला. घरातील महिला आणि मुलं आरोपींच्या हातापाया पडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण आरोपीने गोळीबार करत तिथून पळ काढला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)