नोव्हेंबर महिन्यात 'हे' 12 दिवस बँक राहणार बंद; पहा राज्यानुसार संपूर्ण यादी

नोव्हेंबर महिन्यात असणाऱ्या सणानुसार 8 सुट्ट्या आणि 4 रविवार असे पकडून तब्बल 12 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल त्यामुळे तत्पूर्वीच तुमचे काम उरकून घ्यावे.

Bank Holiday | (Photo Credits: PTI)

नोव्हेंबर महिन्यात पहिल्या तारखेपासून पुढील महिन्यभरात विविध निमित्तांवर तब्बल 12 दिवस राष्ट्रीय बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात असणाऱ्या सणानुसार 8  सुट्ट्या आणि 4  रविवार असे पकडून तब्बल 12 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल त्यामुळे तत्पूर्वीच तुमचे काम उरकून घ्यावे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या राज्यात बँका बंद राहणार असून या सुट्ट्यांचा महाराष्ट्र राज्यावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे सार्वजनिक सुट्टीचा वार व काही राष्ट्रीय सण सोडल्यास महाराष्ट्रात बँक सुरु राहतील.

या महिन्यात छट पुजा, गुरू नानक जयंती, कन्नड राज्योत्सव, वांग्ला फेस्टिव्हल, कनकदास जयंती, ल्हाबब टुचेन, सेंग कट स्नेम आणि रविवारचा समावेश आहे. या सणाच्या तारखा आणि राज्यनुसार बँकाच्या सुट्ट्या कशा असतील याचा आढावा घेऊयात..

अधिक माहितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर भेट द्या.

दरम्यान, बँक बंद असताना ओनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र जर का तुम्हाला पैशांची देवाणघेवाण सोडून अन्य काही कामे करायची असतील तर हे सुट्ट्यांचे वेळापत्रक नक्की लक्षात ठेवा.