Loksabha Election 2019: "मी मागास नाही, मी तर अती मागास आहे", मायावतींच्या टीकेला नरेंद्र मोदींचा पलटवार
मोदींच्या मागवर्गीय जातीवर टीकात्मक विधान करणाऱ्या बहुजन समाजवादी पार्टीच्या मायावतींना नरेंद्र मोदींचे जोरदार प्रतिउत्तर, भाजपच्या कनौज येथील प्रचारसभेत साधला मोदींनी निशाणा
नवी दिल्ली, 27 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कनौज (Kannouj) येथील बीजेपीच्या (BJP Rally) प्रचारसभेत बोलत असताना बहुजन समाजवादी पार्टीच्या (Bahujan Samajvadi Party) सर्वेसर्वा मायावती (Mayavati) यांनी मोदींच्या जाती वरून केलेल्या विधानाला जोरदार प्रतिउत्तर दिले. काही दिवसांपूर्वी मायावती यांनी मोदी तर बनावटी मागासवर्गीय आहेत अशी खरमरीत टीका केली होती, यावर उत्तर देताना मी तर केवळ मागास नाही अती मागास आहे असे म्हणत मोदींनी आपल्या भाषणातून पलटवार केला.
उत्तर प्रदेशात भाजपाच्या विरुद्ध निवडणूक लढवणार असलेल्या समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला लक्ष्य करीत बोलत असताना, ही या पक्षांची 'महामिलावट' माझ्या जातीवरून अफवा पसरवत राजकीय फायदा करून घेऊ पाहत आहेत असा आरोपही मोदींनी या सभेत बोलत असताना केला.
यापूर्वी एका सभेत मायावती आणि अखिलेश यादव यांनी मोदींच्या मागासवर्गीय असण्यावर प्रश्न केला होता, मोदी हे पुढारलेल्या जातीचे असे नेते आहेत ज्यांनी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना अवैधपणे स्वतःचे नाव मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करून घेतले होते असा असे देखील मायावती म्हणाल्या होत्या.
यावर "मी मागास नसून अती मागास आहे, माझी जात तर इतकी मागास आहे की आम्हाला गावात एक घर देखील मिळत नाही, तुम्ही मला बोलायला लावत आहेत म्हणून सांगतो की, माझा देशच मागास आहे तर मी पुढारलेला कसा असेन, मीच माझ्या देशाला पुढारलेला बनवणार आहे, असे म्हणत नरेंद्र मोदीनी मायावतींच्या विधानावर चांगलीच झोड घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती किती? तर एकाही रुपयाचे कर्ज नाही
ANI ट्विट
उत्तर प्रदेशात मायावती, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव या त्रिकुटाने आपणच दलितांचे खरे प्रतिनिधी आहोत आणि भाजपा हे अत्याचारी आहेत असेही विधान केल्याचे काही दिवस आधी समोर आले होते.