उत्तर-पूर्व दिल्लीत CBSE च्या 10 वी, 12वी इयत्तेची बोर्डाची परिक्षा 2 मार्च पासून होणार सुरु
तर दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएसईच्या उत्तर-पूर्व भागातील बोर्डाच्या परिक्षा 29 फेब्रुवारी पर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. बोर्डाने दिल्लीतील परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला होता.
उत्तर-पूर्व दिल्लीत सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या बोर्डाची परिक्षा 2 मार्च पासून सुरु होणार आहे. तर दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएसईच्या उत्तर-पूर्व भागातील बोर्डाच्या परिक्षा 29 फेब्रुवारी पर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. बोर्डाने दिल्लीतील परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला होता. परंतु जे विद्यार्थी परिक्षेत सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी नंतर पुन्हा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच परिक्षेला उपस्थित न राहू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे बोर्डावर झळकवण्यात यावी असे आदेश बोर्डाकडून देण्यात आले आहेत.
सीबीएसई यांनी रविवारी असे म्हटले आहे की, उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या भागातील परिक्षा रद्द करण्यात याव्यात. तसेच मेडिकल आणि इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वेळ लागू शकतो. तर हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या भागातील विद्यार्थ्यांना परिेक्षेला उपस्थित राहणे अशक्य झाले आहे. तसेच येत्या 7 मार्च पर्यंत शाळा बंद राहणार असून परिक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.(Delhi Violence: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, हिंसाचारादरम्यान घरे खाक झालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत)
दरम्यान, उत्तर पूर्व दिल्लीत 23 फेब्रुवारी पासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच आंदोलकांनी दुकाने पेटवण्यासोबत तोडफोड केली. या घटनेत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयात जवळजवळ 150 नागरिकांवर उपचार सुरु आहे. दिल्ली हिंसाचारात जखमी किंवा मृतांच्या परिवाराल दिलासा देण्यासाठी काही पावले उचलली आहेत. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मात्र जे खासगी रुग्णालयात उपचार करणार असल्यास त्यांनी फरिश्ते स्कीम अंतर्गत योजनेचा फायदा घेऊ शकणार आहे.