LPG Gas Cylinder Price: विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर दरात किरकोळ वाढ; 1 जुलैपासून भाववाढ लागू
त्यामुळे दिल्ली येथे 19 किलो वजनाच्या सिलिंडरचा दर 1135.50 रुपये प्रति सिलेंडर असा झाला आहे. तर कोलकाता, मुंबई आणि चेन्नई में 19 किलो वजनाच्या सिलिंडर दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.
विना अनुदानित एलपीजी गॅस (Non-Subsidised LPG Cylinder) दरात वाढ झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच 1 जुलै 2020 पासून लागू आहे. इंडियन ऑयल (Indian Oil) संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे 14.2 किलो वजनाचे विना अनुदानित प्रति गॅस सिलिंडर दर अनुक्रमे 594 रुपये, 620.50 रुपये, 594 रुपये आणि 610.50 रुपये असे राहणार आहेत. दरम्यान, या चारही शहरांमध्ये या आधी 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत अनुक्रमे 593 रुपये, 616 रुपये, 590.50 रुपये और 606.50 रुपये अशी प्रति सिलिंडर होती.
दरम्यान, 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरचे दर दिल्लीमध्ये 4 रुपयांनी घटले आहेत. त्यामुळे दिल्ली येथे 19 किलो वजनाच्या सिलिंडरचा दर 1135.50 रुपये प्रति सिलेंडर असा झाला आहे. तर कोलकाता, मुंबई आणि चेन्नई में 19 किलो वजनाच्या सिलिंडर दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा, दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज कोणतीही दरवाढ नाही; पाहूया मुंबई, नवी दिल्लीसह भारतातील महत्त्वाच्या शहरातील आजचे दर)
व्यावसायिक वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचे दर 1 जुलैपासून दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे अनुक्रमे : 1135.50 रुपये, 1197.50 रुपये, 1090.50 रुपये और 1255 रुपये प्रति सिलेंडर असे झाले आहेत. त्या आधी या सिलिंडरचे दर 1 जून पासून 1139.50 रुपये, 1193.50 रुपये, 1087.50 रुपये और 1254 रुपये प्रति सिलेंडर असे होते.