Digital Arrest Scam: 'डिजिटल अटक' द्वारे डॉक्टरांना 59 रुपयांना गंडा, नोएडा येथील घटना

सायबर गुन्हेगारांनी तिला 48 तासांसाठी 'डिजिटल अटक' (Digital Arrest) केली. त्यानंतर त्यांनी तिची तब्बल 59 रुपयांची फसवणूक केली. नोएडा येथे ही घटना घडली.

Digital Arrest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Police Advisory on Cyber Crime: नोएडा-स्थित (Noida) एक महिला डॉक्टर एका अत्याधुनिक घोटाळ्याला बळी पडली आहे. सायबर गुन्हेगारांनी तिला 48 तासांसाठी 'डिजिटल अटक' (Digital Arrest) केली. त्यानंतर त्यांनी तिची तब्बल 59 रुपयांची फसवणूक केली. नोएडा येथे ही घटना घडली. दरम्यान, दिल्ली एनसीआर प्रदेशात गुन्हेगारीची ही पद्धत अधिकाधिक सामान्य होऊ लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर 77 मध्ये राहणाऱ्या डॉ. पूजा गोयल यांना 13 जुलै रोजी एका व्यक्तीचा फोन आला. जो भारतीय टेलिफोन नियामक प्राधिकरणाचा अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. फोन करणाऱ्याने पूजा यांच्या फोनचा वापर करून अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप केला आहे. डॉ. गोयल यांनी नकार देऊनही, कॉलरने तिला व्हिडिओ कॉलमध्ये सामील होण्यासाठी जबरदस्ती केली. त्यानंतर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली. तिला तीस डिजिटल अटक झाल्याचे सांगण्यात आले.

तब्बल 48 तास डिजिटल अरेस्ट

घोटाळेबाजांनी वेठीस धरले डॉ. गोयल यांना 48 तासांपर्यंत वेठीस धरले आणि शेवटी तिला एका विशिष्ट खात्यात ₹59.54 लाख हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. सूमन गोयल यांनी नोएडा सेक्टर 36 येथील सायबर क्राईम सेलकडे 22 जुलै रोजी तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस आयुक्त (सायबर गुन्हे) विवेक रंजन राय यांनी सांगितले की, पैसे कोठे हस्तांतरित केले गेले याचा तपशील त्यांच्याकडे आहे आणि सध्या ते पडताळत आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (हेही वाचा, What is Digital Arrest? डिजिटल अटक म्हणजे काय? ती कोणाला होऊ शकते? घ्या जाणून)

72 वर्षांच्या महिलेची 83 लाख रुपयांची फसवणूक

'डिजिटल अटक' ची पद्धत घोटाळेबाज याता सामान्यपणे वापरु लागले आहेत. जे त्यांचे लक्ष्य मर्यादित करतात आणि बनावट आयडी वापरून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करतात. अशाच एका प्रकरणात, दिल्लीच्या चित्तरंजन पार्कमधील 72 वर्षीय महिलेस तिचा फोन गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असल्याचे सांगून तिची तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या महिलेलाही तिच्या खात्यावरील रक्कम इतर खात्यांवर हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले. (हेही वाचा, Mobile Verification Scam: तोतया मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकाराला मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्याची धमकी; सोशल मीडियावर पडताळणी घोटाळा उघड)

पोलिसांकडून सल्लापत्र जारी

डिजिटल अटक प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी दिल्ली पोलिसांनी एक मार्गदर्शक सूचना आणि सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "अलिकडच्या काही महिन्यांत, अशा सुमारे दहा घटनांची नोंद झाली आहे. या सर्वांविरोधात एफआयआर नोंदवले गेले आहेत आणि तपास चालू आहे." पोलिसांनी संशयास्पद कॉल्स, विशेषत: व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलद्वारे प्राप्त झाल्यास नागरिकांनी अधिक सतर्क होणे गरजेचे आहे. अनोळखी कॉल असेल तर तो न स्वीकारलेलाच केव्हाही चांगले. शिवाय कॉलची पडताळणी करण्याच्या गरजेवर पोलीस जोर देतात. आलेले कॉल अधिकृत चॅनेलद्वारे कॉलरची ओळखपत्रे तपासण्याची शिफारसही ते करतात. एखाद्या संशयास्पद कॉलवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचा दावा केला गेला किंवा वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती मागितली गेली, तर नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशन किंवा सायबर सेलला तक्रार करावी, असे पलिसांच्या सल्लागारात म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif