Nitish Kumar News: PM नरेंद्र मोदी यांचा हात पकडून नीतीश कुमार यांनी काय पाहिलं? (Watch Video)
नीतीश कुमार यांनी मंचावर बाजूलाच बसलेल्या नरेंद्र मोदी यांचा हात पटकन हातात (Nitish Kumar Holds PM Narendra Modi's Hand On Stage) घेतला. क्षणभर मोदींनाही कळले नाही नीतीश कुमार नेमके काय करत आहेत. दुसऱ्या बाजूला मंचावरील नतेही काहीसे गोंधळात पडले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घ्या नेमके काय घडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंचावर असल्यानंतर त्यांचे स्वपक्षांचे नेतेही काहीसे वचकून असतात. शक्यतो त्यांच्याशी अनाठाई संवाद, अधवा इतर हालचाली करण्यास कोणी धजत नाही. पण, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी याला काहीसा फाटाच दिला. नीतीश यांनी मंचावर बाजूलाच बसलेल्या नरेंद्र मोदी यांचा हात पटकन हातात (Nitish Kumar Holds PM Narendra Modi's Hand On Stage) घेतला. क्षणभर मोदींनाही कळले नाही नीतीश कुमार नेमके काय करत आहेत. दुसऱ्या बाजूला मंचावरील नतेही काहीसे गोंधळात पडले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घ्या नेमके काय घडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते नालंदा विद्यापीठातील काही स्थळांना भेट दिली. तसेच, नव्या कॅम्पसचेही उद्घाटन केले. या वळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि इतरही काही मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही देशांचे प्रतिनीधीही उपस्थित होते.दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमात नीतीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचा अचानक हात पकडला. त्यानंतर दोघांमध्ये काही चर्चा झाली. मग नीतीश कुमार यांनीही आपल्या हाताकडे पाहिले. सुरुवातीला घडलेला प्रसंग पाहून पंतप्रधानांचे सुरक्षारक्षकही काहीसे भांबावले पण पुढच्या काहीच क्षणामध्ये दोघांमध्ये हास्यविनोद सुरु झाले. त्यामुळ सुरक्षारक्षकांनीही सुटकेाचा निश्वास टाकला. (हेही वाचा, Fractured Leg Plasters with Cardboard Carton: नीतीश कुमार यांच्या पायाला कार्डबोर्डच्या पुठ्ठ्याने प्लास्टर, बिहारमधील रुग्णालयात धक्कादायक प्रकार)
हात का पकडला?
प्राप्त माहितीनुसार, ही घटना घडलेला कार्यक्रम नालंदा विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या वेळी मंचावर कुलगुरु अरविंद पनगढिया भाषण करत होते. या वेळी दुसऱ्या बाजूला नीतीश कुमार आणि राज्यपाल होते. अचानक नितीश कुमार यांनी पंतप्रधानांचा हात पकडून काही बोलू लागले. या वेळी त्यांनी पंतप्रधानांचा हात पकडून काही भाष्य केले. त्याला पंतप्रधानांनीही प्रतिसाद दिला. या संबंध घटनेचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. (हेही वाचा, Jashodaben Agra Temple Visit: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पत्नी जशोदा बेन यांना विचारण्यात आला प्रश्न, जाणून घ्या काय दिले उत्तर (Video))
व्हिडिओ
दरम्यान, केंद्रामध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या एनडीए सरकारचा पूर्ण टेकू नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या हातात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसरी शपथ घेतली आहे. मात्र, असे असले तरी नरेंद्र मोदी यांच्या नावावर भारतीय जनतेने भाजपला म्हणावे तसे मतदान केले नाही. इतकेच नव्हे तर भाजपला बहुमताच्या संख्येपासूनही रोखले आहे. उलटपक्षी विरोधकांची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आगोदरच्या एककल्ली कारभाराला बराच अंकूश लागला आहे. परिणामी चंद्राबाबू असोत की नीतीश कुमार या दोघांचीही मर्जी नरेंद्र मोदी आणि भाजपला सांभाळावी लागत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)