नीति आयोग उपाध्यक्ष Rajiv Kumar म्हणतात 'भारताची अर्थव्यवस्था गेल्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वाईट स्थितीत'
राजीव कुमार यांनी सरकारने काळाची पावले उळखून आतापासूनच काही महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे असल्याचा सल्लाही कुमार यांनी दिला आहे.
नीति आयोगाचे उपाध्यक्ष (Vice-Chairman of The NITI Aayog) राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आपल्या वक्तव्यातून भारताच्या विद्यमान आर्थिक स्थितीबद्दल गंभीर इशारा दिला आहे. राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, आज भारताची अर्थव्यवस्था प्रचंड अडचणीत आहे. इतकी की, गेल्या 70 वर्षांच्या इतिहासात भारताची अर्थव्यवस्था इतक्या वाईट स्थितीत गेली आहे. खासगी क्षेत्रात उद्योग उभारणीसाठी कोणही पैसे गुंतवायला आणि कर्ज द्यायला राजी नाही. नोटबंदी आणि जीएसटी (GST) या निर्णयानंतरच ही स्थिती निर्माण झाल्याचेही राजीव कुमार यांनी म्हटले आहे. राजीव कुमार यांनी सरकारने काळाची पावले उळखून आतापासूनच काही महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे असल्याचा सल्लाही कुमार यांनी दिला आहे.
राजीव कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्था विद्यमान स्थितीचे वर्णन करताना 'अभूतपूर्व' या शब्दाचा वापर केला आहे. राजीव कुमार म्हणतात, 'आज कोणीही कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही. हे केवळ सरकारी आणि खासगी क्षेत्रापुरतेच नव्हे तर, खासगी क्षेत्राला कर्ज द्यायलाही आज कोणी इच्छुक नाही.' राजीव कुमार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, नोटबंदी, GST आणि दीवाळखोरी कायदा आदींनंतर अर्थव्यवस्थेतील स्थिती बरीच बदलली आहे. पूर्वी सुमारे 35 टक्के रोख उपलब्धता असे मात्र आता ती बरीच कमी झाली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाताना दिसत आहे. (हेही वाचा, कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली)
एएनआय ट्विट
राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, 2009 ते 2014 या काळात कोणताही विचार न करता कर्जाचे वाटप करण्यात आले. ज्यामुळे 2014 नंतर NPA मध्ये मोठी वाढ झाली. राजीव कुमार यांनी म्हटले की, एनपीए वाढल्यामुळे बँकांची कर्ज देण्याची क्षमताच घटली आहे. सोबत राजीव यांनी असेही म्हटले आहे की, बँकांच्या कर्जवाटपाची भरपाई NBFC ने केली आहे. एनबीएफसी च्या कर्जांमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.