Nisarga Cyclone संबंधित गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली NDMA च्या अधिकाऱ्यांसह महत्वाची बैठक
यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यंत्रणा आता सज्ज झाली आहे. याच कारणास्तव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निसर्ग चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या अधिकाऱ्यांसह एक महत्वाची बैठक पार पाडली.
देशात अम्फान (Amphan Cyclone) चक्रीवादळानंतर आणखी एक वादळाचे संकट घोंगावू लागले आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यंत्रणा आता सज्ज झाली आहे. याच कारणास्तव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निसर्ग चक्रीवादळापासून (Nisarga Cyclone) बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या अधिकाऱ्यांसह एक महत्वाची बैठक पार पाडली. या वेळी अमित शहा यांनी परिस्थितीवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. चक्रीवादळ येत्या 3 जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात धडकणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने असे म्हटले आहे की, निसर्ग चक्रीवादळ 3 जूनला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर धडकू शकते.(Amphan, Nisarga, Arnab चक्रिवादळाला नावं कसं मिळतं? पहा IMD ने जारी केलेल्या 169 नावांची संपूर्ण यादी!)
तर अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होणार असल्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तुकड्यांपैकी महाराष्ट्रात-9, मुंबईत- 3, पालघर येथे 2, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी 1-1 NDRF च्या तुकड्या तैनात केल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकार अलर्ट झाले असून यासंबंधित महाराष्ट्र आणि गुजरात येथे चक्रीवादळापूर्वी सुचना देण्यात आली होती. कारण येते 3 जूनला राज्यातील काही भागात तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Nisarga Cyclone: मच्छिमार्यांना 4 जूनपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा; महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर वादळाचे सावट)
Tweet:
Tweet:
चक्रीवादळाची परिस्थिती गांभीर्याने घेत मच्छिमारांनी पुढील 48 तासात समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान वेगाने वारे वाहणार असून समुद्राच्या उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. 3 जूनच्या सकाळी पूर्व-मध्य आणि उत्तर-पूर्व अरबी समुद्रात आणि कर्नाटकसह दक्षिण महाराष्ट्रातील तटावर 90-100 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. याची गति वाढून 110 किमी प्रति तास होण्याची शक्यता आहे. आयएमडी यांच्यानुसार 4 जूनच्या संध्याकाळी 5.30 वाजचा चक्रीवादळाचा वेग कमी होणार असून हवेचा वेग 60-70 किमी प्रति तास होणार आहे.