IPL Auction 2025 Live

Nirbhaya Gangrape Case: दोषी विनय शर्मा याचा तिहार जेलमध्ये भिंतीवर डोके आपटून स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न

यात तो किरकोळ जखमी झाला आहे.

Tihar Jail. (Photo Credits: PTI/File)

Nirbhaya Gangrape Case: निर्भया गँगरेप प्रकरणातील एक दोषी विनय शर्मा (Vinay Sharma) याने 16 फेब्रुवारीला तिहार तरुंगात भिंतीवर डोके आपटून स्वतःला इजा पोहण्याचा प्रयत्न केला. यात तो किरकोळ जखमी झाला आहे. निर्भया गँगरेप प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने दोषीँविरोधात डेथ वारंट जारी केले आहे. त्यानुसार त्यांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. यापूर्वी दोनदा दोषीँविरोधात डेथ वारंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार त्यांना पहिल्या वेळी 22 जानेवारी तर दुसऱ्या वेळी 1 फेब्रुवारी ही फाशी देण्याची तारीख ठरली होती. अखेर बराच वेळ लांबणीवर पडलेली फाशीची शिक्षा 3 मार्च रोजी देण्याचे निश्चित झाले आहे.

सुनावणी पूर्वी दोषी विनयचे वकील एपी सिंह यांनी विनयची मानसिक स्थिती ठीक नसून त्याने अन्नपाणी सोडल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोर्टाने डेथ वारंट जारी करण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करावा, असे विनयच्या वकीलांकडून सांगण्यात आले होते. तसंच दया याचिका फेटाळून लावत अखेर कोर्टाने डेथ वारंट जारी केले. (निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना 3 मार्च ला होणार फाशी; पटियाला न्यायालयाने जारी केले नवे डेथ वॉरंट)

ANI ट्विट:

नवे डेथ वॉरंट येताच निर्भयाची आई आशा देवी यांनी आपण या निर्णयाने काही फार आनंदी नसल्याचे म्हटले होते. यापूर्वी दोनदा फाशी देण्याचे ठरले होते, मात्र तरीही आम्ही आतापर्यंत लढत होतो. आता तरी 3 मार्च ला फाशी होईल, अशी आशा निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?

दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 च्या रात्री 23 वर्षीय तरुणी निर्भया हिच्यावर गँगरेप करण्यात आला. त्यानंतर तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. निर्भया पॅरामेडिकलची विद्यार्थीनी होती. गँगरेप नंतर तिच्यावर दिल्लीत उपचार सुरु होते. त्यानंतर तिला उपचारासाठी एअरलिफ्टने सिंगापूरला नेण्यात आले होते. मात्र 13 दिवस तिची मृत्यूशी झुंज चालू होती. अखेर 29 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी 31 ऑगस्ट 2013 रोजी 6 आरोपी कोर्टात दोषी ठरले.

या 6 पैकी एक अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठण्यात आले. तर एका दोषीला तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. इतर चार दोषी- पवन, मुकेश, अक्षय आणि विनय यांना तिसऱ्यांना डेथ वारंट जारी झाले आहे.