Nirbhaya Case: दोषी विनय कुमार शर्मा, मुकेश सिंह यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
दिल्लीतील निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोन्ही आरोपींची फाशी रद्द करण्याची पुनर्विचार याचिका आज (14 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
2012 Delhi Gang Rape Case: दिल्लीतील निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्मा ( Vinay Kumar Sharma)आणि मुकेश सिंह (Mukesh Singh)या दोन्ही आरोपींची फाशी रद्द करण्याची पुनर्विचार याचिका आज (14 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान दिल्लीच्या पतियाळा कोर्टाकडून निर्भया गॅंग रेपमधील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना 22 जानेवारी 2020 दिवशी सकाळी 7 वाजता तिहार जेलमध्ये फाशी दिली जाणार आहे. Nirbhaya Case: आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता होणार फाशी.
दरम्यान इतर खटल्यांप्रमाणे निर्भया गॅंग रेप प्रकरणातील आरोपींना देखील फाशीच्या शिक्षेऐवजी आजीवन तुरूंगवासाची शिक्षा द्यावी अशी अशी मागणी त्यांच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने पुर्विचार याचिका देखील फेटाळली आहे. याकरिता जस्टिस एन वी रामन्ना यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ होते. इन चेंबर करण्यात आलेल्या सुनावणीमध्ये आज फाशी टाळण्याचा शेवटचा पर्याय देखील संपला आहे.
ANI Tweet
16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये बलात्कार करुन तिला पूर्णपणे जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपीला अटक केली होती. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी सिंगापूर येथील माउन्ट एलिझाबेथ रुग्णालयात निर्भयाने अखेरचा श्वास घेतला होता.