Nirbhaya Case: दोषी अक्षय सिंह याची पत्नी पुनिता देवी पटियाला हाऊस न्यायालयाबाहेर बेशुद्ध

दिल्लीच्या न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, निर्भाया प्रकरणात कायद्यातून सवलत घेण्यासाठी या चारही दोषींची कोणताही याचिका न्यायालयाकडे प्रलंबित नाही.

Sunita Devi | (Photo Credits: Twitter/ ANI)

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील (Nirbhaya Case) दोषी अक्षय सिंह याची पत्नी सुनिता देवी (Sunita Devi) हिचा हायहोल्टेड ड्रामा आज न्यायालयाबाहेर पाहायला मिळाला. अक्षय याची पत्नी पटियाला हाऊस कोर्ट (Patiala House Court) इमारतीबाहेर आज बेशुद्ध पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अक्षय याच्या याचिकेवरील निर्णय पटियाला हाऊस न्यायालयाने राखून ठेवला आहे. अक्षय याने दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करुन फाशीची शिक्षा माफ करावी अशी मागणी केली आहे. अक्षय याने याचिकेत अशीही मागणी केली आहे की, त्याची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी. न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकूण घेतल्यावर आपला निर्णय राखून ठेवला आहे.

दरम्यान, दिल्लीच्या न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, निर्भाया प्रकरणात कायद्यातून सवलत घेण्यासाठी या चारही दोषींची कोणताही याचिका न्यायालयाकडे प्रलंबित नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांना सरकारी वकिलानी सांगितले की, दोषी अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांची दुसरी दया याचिका सुनावणी केल्या शिवाय ती या आधारावर फेटाळून लावण्यात आली होती की, पहिल्या दया याचिकेवर सुनावणी करण्यात आली होती. त्यामुळे आता या याचिकेवर नव्याने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही. (हेही वाचा, दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरण: दोषी अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी घेतली आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव)

एएनआय ट्विट

या प्रकरणात चारही दोषींमधील तिघांनी त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करत दिल्ली न्यायालयात दाद मागितली होती. त्यातील एकाची दुसरी दया याचिका प्रलंबीत आहे. दरम्यान, पाच मार्च रोजी कनिष्ठ न्यायालयाने मुकेश सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंह (31) यांना फाशी देण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट जारी केले होते. या चारही दोषींना 20 मार्च या दिवशी सकाळी साडे पाच वाजता फाशी दिली जाणार आहे.