New Traffic Rules: वाहतूकीचे नियम मोडणे पडेल आता महागात, अवघ्या काही मिनिटांतच येईल लाखो रुपयांची पावती हातात
त्यामुळे वाहन सावधगिरीने चालवा. नव्या वाहतूक नियमानुसार तुम्ही त्याचे पालन केले नाही तर...
New Traffic Rules: वाहन चालवताना निष्काळजीपणा केल्यास पोलिसांकडून तुम्हाला लाखो रुपयांची पावती हातात मिळू शकते. त्यामुळे वाहन सावधगिरीने चालवा. नव्या वाहतूक नियमानुसार तुम्ही त्याचे पालन केले नाही तर Motor Vehicle Act अंतर्गत तुमचे 1.41 लाख रुपयांहून अधिक चलान कापले जाईल. New Motor Vehicles Act 2019 Amendment लागू झाल्यानंतर असे आधीसुद्धा झाले आहे.(Bank Rules Change From 1 February 2022: 1 फेब्रुवारीपासून SBI, PNB, BOB च्या ग्राहकांसाठी बदलणार 'हे' नियम; वाचा सविस्तर)
नव्या नियमाअंतर्गत जर तु्म्ही ट्रक चालवताना वाहतूकीचे नियम मोडल्यास 1,41,700 रुपयांचे चलान भरावे लागू शकते. सप्टेंबर 2019 मध्ये ओवरलोडिंगच्या कारणामुळे दिल्लीत राजस्थान येथे जाणाऱ्या एका ट्रकचे 1,41.700 रुपयांचे चलान कापले होते. त्यानंतर दंडाचे शुल्क मालकाने रोहिणी कोर्टात जाऊन भरला होता. त्यामुळे तुमच्यासोबत सुद्धा असा प्रकार घडू नये म्हणून वाहतूकीचे नियम पाळा.(Indian Railway: प्रवासादरम्यान रात्री 10 नंतर रेल्वे डब्यात मोठ्याने बोलण्यास बंदी, भारतीय रेल्वेचा नवा नियम)
ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करत असाल तर 5 हजार रुपये, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटन नसल्यास 10 हजार, फिटनेस सर्टिफिकेट नसल्यास 10 हजार रुपये, परमिट वॉयलेशनसाठी10 हजारांचे चलान कापले जाऊ शकते. या व्यतिरिक्त इंन्शुरन्स नसल्यास 4 हजार, पीयूसी नसेल तर 10 हजार, बांधकामाचे सामान उघड्याने नेल्यास 20 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. त्याचसोबत ओवरलोडिंगवर वाहतूक पोलिसांकडून 20 हजारांचे चलान कापले जाऊ शकते. त्यानंतर जेवढे टन अधिक असणार त्यासाठी वेगळे 2 हजार रुपयांप्रमाणे दंड आकारला जाणार.