खूशखबर! आता सरकार ‘स्टील स्क्रॅप पॉलिसी’अंतर्गत विकत घेणार तुमचे जुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन

यासाठी सरकार पुढील आठवड्यात ‘स्टील स्क्रॅप पॉलिसी’ आणणार आहे. विशेष म्हणजे या वस्तू विकल्यांनंतर लोकांना भरघोस इन्सेंटीव्हही मिळणार आहे.

New steel scrappage policy government will buy old refrigerator washing machine (Photo Credit - File Photo )

तुमच्या घरातील जुने फ्रिज, (Refrigerator) एसी, (Ac) वॉशिंग मशीन (Washing Machine) आता सरकार विकत घेणार आहे. यासाठी सरकार पुढील आठवड्यात ‘स्टील स्क्रॅप पॉलिसी’ (Steel Scrappage Policy) आणणार आहे. या धोरणाचा मसुदा तयार झाला आहे.  लवकरच त्याला अंतिम रुप देण्यात येणार आहे. आतापर्यंत स्टील स्क्रॅप पॉलिसीमध्ये फक्त वाहनांचा समावेश होता. मात्र, यामध्ये आता पहिल्यांदाच एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनचा समावेश करण्यात येणार आहे. या पॉलिसीअंतर्गत अनेक ठिकाणी ‘स्क्रॅप सेंटर’ (Scrap Center) सुरू करण्यात येणार आहे. लोकांना याठिकाणी जाऊन स्टील स्क्रॅप विकता येणार आहे. यामध्ये सर्वच प्रकारातील जुन्या स्टीलचा समावेश असणार आहे.

हेही वाचा - 1 एप्रिल 2020 च्या जुन्या वाहनांवर बंदी, प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

स्टील स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत इन्सेंटीव्हही मिळणार –

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही स्क्रॅप केंद्रात विकल्यास सरकार तुम्हाला इन्सेंटीव्हही देणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मिळणार आहे. सध्या इन्सेंटिव्हची रक्कम ठरलेली नाही. परंतु, लवकरच ती ठरवण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा - Car purchase: पेट्रोल पंप घेणार निरोप; वाहन खरेदी करताना घ्या काळजी; इलेक्ट्रिक कार काळाची गरज

या पॉलिसीमुळे लोकांना चांगलाच फायदा मिळणार आहे. तसेच या वस्तूंचा पुनर्वापरही करणं शक्य होणार आहे. या पॉलिसीअंतर्गतच लोकांना जुन्या गाड्या विकून नवीन गाड्यांची खरेदी करता येणार आहे. तसेच जुन्या स्टीलच्या वस्तूचा वापर वाढल्याने स्टीलची आयातीमध्ये घट होणार आहे.