IPL Auction 2025 Live

Netaji Subhash Chandra Bose: सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात परत आणाव्यात, नेताजींच्या मुलीची भारत सरकारकडे मागणी

नेताजींची कन्या अनिता बोस फाफ यांनी भारत सरकारकडे नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांचा मृत्यू हा आजही एक रहस्यचं आहे. काय,कधी, केव्हा कसं घडलं या बाबतची सविस्तर माहिती आज पर्यत कुणाकडे काहीही माहिती नाही. देशासाठी (India) नेताजींनी दिलेलं बलिदान अतुल्य आहेत. स्वातंत्र्यदिनी (Independence Day), प्रजासत्ताक दिन (Republic Day) आपण कायम नेतांजीची आठवण काढतो. पण आपल्या देशासाठी झटलेल्या नेत्याच्या अस्थीं भारतात नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा दावा केला जातो. त्यानंतर त्यांचे अवशेष एका जपानी (Japan) अधिकाऱ्याने गोळा केले आणि टोकियोच्या (Tokyo) रेन्कोजी मंदिरात (Renkoji Temple) जतन केले. तेव्हापासून त्या अस्थी जपान मध्येच आहेत. त्या भारतात आणलेल्या नाहीत. तरी आता नेताजींची कन्या अनिता बोस फाफ (Anita Bose Pfaff) यांनी भारत सरकारकडे नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे.

 

अनिता बोस फाफ या सध्या जर्मनीत (Germany) वास्तव्यास आहे. अनिता बोस सांगतात की, नेताजींना भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा आणखी काहीही महत्त्वाचे नव्हते. पण ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते आयुष्यभर झटले त्या देशात त्यांच्या अस्थी आणाव्यात अशी मागणी नेताजींची मुलगी अनिता बोस फाफ यांनी केली आहे.तसेच ताजींच्या अवशेषांच्या डीएनए (DNA) चाचणीसाठी त्या तयार आहेत. मंदिरातील पुजारी आणि जपान सरकारलाही या चाचणीला हरकत नसून ते अवशेष सुपूर्द करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. तरी भारतात नेताजींच्या अस्थी ठेवण्यात याव्या अशी इच्छा अनिता बोस फाफ यांनी व्यक्त केली आहे.(हे ही वाचा:- Independence Day 2022: अंतराळात फडकला भारताचा तिरंगा, Space Kidz India टीमची अभिमानास्पद कामगिरी; पहा व्हिडीओ)

 

ऑस्ट्रियामध्ये (Australia) जन्मलेल्या अर्थशास्त्रज्ञ (Economist) अनिता बोस फाफ या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची पत्नी एमिली शेंकेल (Emilie Schenkl) यांच्या कन्या आहेत. ब्रिटीशांशी लढण्यासाठी नेताजी जर्मनीतून दक्षिण पूर्व आशियामध्ये गेले तेव्हा त्या अवघ्या चार महिन्यांच्या होत्या.  नेताजींची एकुलते एक अपत्य अनिता बोस फाफ पूर्वीपासून नेताजींच्या अस्थी रेनकोजी मंदिरात असल्याचे सांगत आहेत. नेताजींच्या अनेक भारतीय नातेवाईकांनी तैवानमधून (Taiwan) नेताजी कुठे गेले हे शोधण्यासाठी अनेकवेळा सरकारला विनंती केली आहे.  तर नेताजींच्या कण्येच्या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे बघण महत्वाचं ठरणार आहे.