Omicron चा धोका पाहता भारतात 15 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या निर्णयाला स्थगिती

डायरेक्ट जनरल ऑफ सिव्हिल एविएशनने बुधवारी ही माहिती दिली आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

कोरोना व्हायरसच्या नवा वेरियंट ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 15 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या सामान्य आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेसंदर्भातील निर्णयाला स्थगिती दिली आहे. डायरेक्ट जनरल ऑफ सिव्हिल एविएशनने बुधवारी ही माहिती दिली आहे. डीसीजीएने एक आदेश जाहीर करत असे म्हटले की, कर्मशियल फ्लाइट्स पुन्हा एकदा सुरु करण्याबद्दल आपल्या निर्णयावर विचार केला जाईल. तर कोरोनाच्या नव्या वेरियंटमुळे हा निर्णय घेतला जात असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. परंतु फ्लाइट्सची सामान्य उड्डाणे कधी पासून सुरु होणार याबद्दल डीसीजीएकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

नागरिक उड्डाण मंत्रालयाने 26 नोव्हेंबरला आदेश जाहीर करत असे म्हटले होते की, भारतात येणारी-जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15 डिसेंबर पासून सामान्य रुपात सुरु केली जातील. परंतु संपूर्ण जगभरात सातत्याने वाढत असलेल्या ओमिक्रॉन वेरियंटच्या धोक्यामुळे भारत सरकारने आपला हा निर्णय टाळला आहे. त्याचसोबत परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकराने गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत.(Omicron Variant: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांचे ओमिक्रॉनबाबत मोठे विधान, वाचा काय म्हणाले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात)

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या गाइडलाइन्सनुसार, रेड लिस्टमध्ये येणाऱ्या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. त्याचसोबत प्रवाशांच्या चाचणीचे रिपोर्ट्स येत नाहीत तो पर्यंत त्यांना विमानतळ सोडून जाणे किंवा कनेक्टिंट फ्लाइटमधून प्रवास करण्याची परवानगी नसणार आहे. त्याचसोबत अन्य देशातून येणाऱ्या लोकांना सुद्धा विमानतळावरुन जाण्याची परवानगी नसणार आहे. त्यामुळे अशा नागरिकांना 14 दिवसांपर्यंत स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif