Bihar Loksabha Election 2024: बिहारमध्ये भाजप 17 जागांवर लढवणार निवडणूक, जेडीयूला मिळाल्या 'इतक्या' जागा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

Amit Shah Nitish Kumar Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहारमध्ये लोकसभेच्या (Bihar Loksabha) 40 जागांपैकी भाजप 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर 16 जागांवर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा पक्ष जनता दल युनायटेड (JDU) निवडणूक लढवेल. चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर जीतन राम मांझी यांचा हम एका जागेवर निवडणूक लढवले. एक जागा उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला देण्यात आलेली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) जागावाटपावर एकमत झालं आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (आर) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. (हेही वाचा - Seema Kushwaha Joins BJP: निर्भया, हाथरस आणि श्रद्धा वालकर प्रकरणातील पीडितांच्या वकील सीमा कुशवाह यांचा भाजपमध्ये प्रवेश)

पश्चिम चंपारण, पू्र्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियापूर, बेगुसराय, नवादा, पटनासाहिब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर आणि सासाराम या जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार आहे. तर वाल्मिकी नगर, सीतामढी, झंझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जहानाबाद आणि शिवहर या लोकसभा मतदारसंघामधून जेडीयू उमेदवार उभे करणार आहे. तर  चिराग पासवान यांचा पक्ष वैशाली, हाजीपूर समस्तीपूर, खगडिया आणि जमुई या जागा लढवणार आहे.

पाहा व्हिडिओ -

आम्ही सगळे मिळून सर्वच 40 जागा जिंकणार आहोत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत विनोद तावडे यांनी याबद्दलची माहिती दिली.