Mohammad Faizal: NCP खासदार मोहम्मद फैजल यांची लोकसभा वापसी; Lok Sabha सचिवालयाकडून सदस्यत्व रद्दतेची कारवाई मागे

खासदार मोहम्मद फैजल पी.पी. यांचे सदस्यत्व बहाल करण्याची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने 29 मार्च 2023 रोजी जारी केली.

Lakshadweep MP Mohammed Faizal | (File Image)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे लक्षद्वीप येथील खासदार मोहम्मद फैजल (Lakshwadeep MP Mohammed Faizal) यांना लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने (Lok Sabha Secretariat) याबाबत अधिसूचना जारी करत माहिती दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका फौजदारी खटल्यात आगोदरच्या शिक्षेवर दिलेल्या स्थगिती आदेशानंतर लोकसभा सचिवालयाने हालचाली केल्या आणि त्यांना सदस्यत्व पुन्हा बहाल केले. खासदार मोहम्मद फैजल पी.पी. यांचे सदस्यत्व बहाल करण्याची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने 29 मार्च 2023 रोजी जारी केली. केरळ उच्च न्यायालयाने फौजदारी खटल्यातील पूर्वीच्या शिक्षेवर दिलेल्या स्थगितीच्या आदेशाच्या आधारे सचिवालयाने ही अधिसूचना काढल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असलेल्या मोहम्मद फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत म्हटले होते की, त्यांना एका फौजदारी खटल्यात झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. असे अताना जर शिक्षा झाल्याने सदस्यत्व आपोआप रद्द होत असेल तर शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर ते आपोआप प्राप्तही व्हायला हवे. आपल्या मागणीसह त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आपल्याला अद्यापही सदस्यत्व परत दिले गेले नाही. त्यामुळे लोकसभा प्रतिनिधी असताना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला न मिळणे हा देखील अन्यायच आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव! संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका)

सर्वोच्च न्यायालयासमोरील आपल्या याचिकेत, फैजल यांनी म्हटले की, 25 जानेवारी रोजी केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असतानाही लोकसभा सचिवालय त्यांच्याविरुद्ध जारी केलेली अपात्रता अधिसूचना मागे घेतली नाही.

ट्विट

दरम्यान, वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर फैजल यांना लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याच्या निर्णयाची देशभर चर्चा सुरु आहे.