Naval Dockyard South Mumbai: ठाणे शहरानजिक असलेल्या कळवा येथील 27 वर्षीय यांत्रिक अभियंत्याला भारतीय नौदलातील (Indian Navy) युद्धनौकांबाबतची (Warship Information संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटकडे पाठविल्याच्या आरोपावरून अटक (Kalwa Engineer Arrested) करण्यात आली आहे. ही माहिती सोशल मीडियावर 'महिला' असल्याचा बनाव करणाऱ्या एजंटला पुरवण्यात आली होती. आरोपी एका संरक्षण तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता आणि पैशासाठी गुप्त माहितीची देवाणघेवाण करत होता. फेसबुकवर महिला असल्याचे भासवून त्याच्याशी संवाद साधणाऱ्या पाकिस्तानी एजंटला संवेदनशील माहिती (Defence Leak) पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

आरोपीचे नाव रवींद्र वर्मा

अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव रवींद्र वर्मा असे असून, त्याने फेसबुकवर एका बनावट महिला खात्याशी संपर्क साधून ही माहिती पुरवण्यास सुरुवात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फेसबुकवर महिला म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या एका पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात तो आल्याचे वृत्त आहे. प्राथमिक तपासानुसार, एजंटने वर्माशी मैत्री करण्यासाठी आणि त्याचा विश्वास मिळवण्यासाठी 'इस्प्रीत' आणि 'पायल शर्मा' या बनावट ओळखी वापरल्या.

दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये प्रवेश

वर्मा एका संरक्षण तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत होता. या कंपनीच्या माध्यमातून त्याला दक्षिण मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये प्रवेश मिळत होता. त्याने तेथील युद्धनौका आणि पाणबुडींबाबतची माहिती गोळा करून ती पाकिस्तानी एजंटकडे पुरवली.

स्केचेस आणि ऑडिओ नोट्स वापरून माहिती शेअर करणे

डॉकयार्ड परिसरात मोबाईल फोन प्रतिबंधित असल्याने, वर्मा यांनी संवेदनशील माहिती रेकॉर्ड करण्यासाठी स्केचेस आणि आकृत्या तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. नंतर सुरक्षित क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्याने ऑडिओ संदेशांसह विविध माध्यमांद्वारे ही माहिती शेअर केली.

माहितीच्या मोबदल्यात देशांतर्गत व परदेशी खात्यांतून पैसे जमा

प्रत्येक माहितीच्या मोबदल्यात वर्माच्या बँक खात्यांमध्ये भारतात तसेच परदेशातून पैसे जमा होत होते. यावरून ही एक संगठित हेरगिरीची जाळे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

2024 पासून पाकिस्तानच्या एजंटशी संपर्क

वर्मा याने 2024 मध्ये फेसबुकवरून 'इस्प्रीत' आणि 'पायल शर्मा' या नावांनी आलेल्या रिक्वेस्ट स्वीकारल्या आणि त्यानंतर पाकिस्तानच्या एजंटशी संवाद सुरू झाला. एजंटने भारतातील युद्धनौकांबाबत माहिती लागणाऱ्या प्रकल्पावर काम करत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, तो कोणाला माहिती पाठवत आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती आणि त्याच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारले, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकार भारतीय संरक्षण क्षेत्रातील सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात असून, यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे.