जम्मू काश्मीर येथे दहशवादी चकमकीत नाशिकचे जवान अर्जुन वाळुंज शहीद

यामद्ये नाशिकच्या वीरजवान अर्जुन वाळुंज यांना वीर मरण आले आहे.

Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) च्या कुपवाडा (Kupwada) येथे आज 20 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी (Pakistani Terrorists)  भारताच्या शस्त्रसंधीचे (LOC)  उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला इतकंच नव्हे तर तंगधार सेक्टरमध्येे या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुद्धा केला. भारतीय सैन्याने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले मात्र या चकमकीत लढताना नाशिक जिल्ह्यातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (Arjun Valunj) हे शाहिद झाले आहेत. चांदवड तालुक्यातील भरवीर येथील रहिवासी वाळुंज यांचे पार्थिव उद्या मुंबईत आणण्यात येईल त्यानंतर मंगळवारी मूळगावी भरवीर येथे त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

लोकसत्ताच्या माहितीनुसार, या दहशवादी हल्ल्यात दोन भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. तर एका नागरिकाचाही मृत्यु झाला.या हल्ल्याला उत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या शस्त्रसंधी जवळील कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी उखळी तोफांचा वापर करण्यात आला. भारतीय लष्कराने केलेल्या धडाकेबाज कारवाईत नीलम व्हॅलीतील चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या चार ते पाच सैनिकांसह 20 ते 22 दहशतवादी ठार झाले आहेत.

दरम्यान, यापूर्वी अनेकदा पाकिस्तानने अशाच प्रकारचे हल्ले करून दहशवादाला खतपाणी घातले आहे. या टेरर फंडिंग च्या आरोपामुळे एफएटीएफ (FATF) तर्फे पाकची ग्रे लिस्ट देशांच्या यादीत गणना केली आहे. एवढेच नाही येत्या काळात ही स्थित न सुधारल्यास पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट मध्ये सुद्धा टाकले जाऊ शकते आणि परिणामी पाकिस्तान समोर इंटरनॅशनल बॉयकॉट सारखी परिस्थिती निर्माण होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif