Narendra Singh Tomar on Shared Pawar: शरद पवार यांच्या सारखे अनुभवी नेते सुद्धा तथ्य चुकीच्या पद्धतीने सांगतायत, कृषी कायद्यावरुन नरेंद्र सिंह तोमर यांनी साधला निशाणा

तर प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागल्याने त्याचे प्रतिसाद सर्वत्र उमटले गेल्याचे दिसून आले

नरेंद्र सिंह तोमर आणि शरद पवार (Photo Credits-File Image)

Narendra Singh Tomar on Shared Pawar:  देशात केंद्राच्या कृषी कायद्यावरुन गेल्या एका महिन्यांपेक्षा अधिक वेळ आंदोलन सुरु आहे. तर प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागल्याने त्याचे प्रतिसाद सर्वत्र उमटले गेल्याचे दिसून आले. अशातच राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी केंद्र सरकावर हल्लाबोल करत हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार ठरवले. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचे ही शरद पवार यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर  यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तोमर यांनी असे म्हटले आहे की, शरद पवार यांच्या सारखे अनुभवी नेते सुद्धा तथ्य चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत.

तोमर यांनी पुढे असे म्हटले की, शरद पवार एक अनुभवी राजकरणी आहेतच पण माजी कृषी मंत्री सुद्धा होते. त्यामुळे पवार यांना शेती संबंधित मुद्दे आणि त्यावरील तोडग्यासंबंधित ही उत्तम माहिती आहे. शरद पवार यांना अशाच पद्धतीच्या कृषी कायद्याच्या बाजूने होते. त्यासाठी त्यांनी मेहनत सुद्धा केली होती. पण आता ज्या पद्धतीने पवार आपली बाजू मांडत आहे ते पाहून हैराण होत आहे. पवार यांना सर्वकाही माहिती असून सुद्धा तथ्य चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत. माझ्या मते त्यांच्याकडे योग्य तथ्य आली असावीत आणि ते आपले मत बदलतील.(Farmers' Tractor Rally: 'पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक करू नका' दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यानच्या हिंसाचारावर शरद पवार यांची प्रतिक्रिया)

Tweet:

दरम्यान, पंजाब-हरियाणा देशाचा अन्नदाता आहे. सरकारने शेतकऱ्यांना न दुखावता मार्ग काढायला हवा होता असे शरद पवार यांनी म्हटले होते ज्या पद्धतीने येण्या जाण्यासाठी काही परवानग्या द्यायला हव्या होत्या. पण जाचक अटी लादल्या गेल्या. त्यामुळे प्रतिकार झाला. संयम आणि 60 दिवसांचे आंदोलन पाहून ही परिस्थिती हाताळायला हवी होती. पण ते न केल्याने वातावरण चिघळले आहे. याशिवाय एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आपण पाहिला आहे. तो सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक मोदी सरकारने करू नये, असेही आवाहन शरद पवार