नागपुरात माणुसकील काळीमा फसणारी घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले असुन तिचे निरवस्त्र फोटो सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल (Viral) करण्याची धमकी देण्यात आली. पिडीत मुलगी बारावीची (HSC) विद्यार्थिनी आहे आणि नागपुरात (Nagpur) होस्टेलमध्ये (Hostel) वास्तव्यास आहे. आरोपी प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (Pradeep Kumar Shree Krishna Nitnavane) हा पिडीत मुलीचा केअर टेकर (Care Taker) असुन नक्षलविरोधी अभियानात तो पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पिडीत मुलीला तुझ्यासाठी सरप्राईज (Surprise) असल्याचे सांगून आरोपी मुलीला 13 जुलै रोजी चारचाकी वाहनातून चिखलदरा (Chikhaldara) येथे घेवून गेला. तिथे ते लॉजवर (Lodge) थांबले. दरम्यान पिडीतेस ज्यूसमधून (Juice) गुंगीचं औषध (Medicine) देत दारुचे (Alcohol) सेवन केले.
यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिला तिच्यासोबत अत्याचार झाल्याची बाब लक्षात आली. तिने आरोपीस याबाबत विरोध केला. मात्र, ही बाब कुणाला सांगायची नाही आणि सांगितल्यास आरोपीने पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही पिडीतेस निर्वस्त्र करीत त्याने तिचे फोटो काढलेत. तसेच असलेल्या खाकीचा धाक देत निर्वस्त्र फोटो (Nude Pics) व्हायरल करीत, बदनामी करण्याची धमकी दिली. पिडीत मुलगी या सगळ्या प्रकारानंतर खुप घाबरली. हा सगळा प्रकार चिखलदऱ्यात घडल्यानंतर पिडीत आणि आरोपी नागपुरात परत आलेत. (हे ही वाचा:- Pune: स्कूलबस चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल)
नागपुरात परत आल्यावर मुलीने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून प्रदीपकुमार विरुद्ध तक्रार केली. सिताबर्डी पोलिसांनी (Police Station) गुन्हा नोंदवून घेत पॉक्सो (POCSO) अंतर्गत आरोपी उपनिरीक्षक प्रदिपकुमारला अटक केली. संबंधीत प्रकरणाची चौकशी सुरु असुन लवकरच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा पिडीतेच्या कुटुंबियांनी केली आहे. नागपुरात गुन्ह्याचं प्रमाम दिवसेंदिवस वाढत चाल्लं आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटना नागपुरातून ऐकायला येतात तरी प्रशासनाकडून लवकर कठोर पावलं उचल्यात यावी अशी नागपूरातील नागरिकांची अपेक्षा आहे.