Mumbai Shocker: अंधेरी येथे कानाच्या शस्त्रक्रियेदरम्यान कथितरीत्या भूल दिल्याने 28 वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू; तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी एडीआर नोंदवला आणि तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतरच तिचा मृत्यू ॲनेस्थेसियाच्या ओव्हरडोजमुळे झाला की नाही हे डॉक्टरांना समजेल.

Mumbai Shocker: अंधेरी येथे कानाच्या शस्त्रक्रियेदरम्यान कथितरीत्या भूल दिल्याने 28 वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू; तपास सुरु
Photo Credit- X

मुंबईमध्ये 28 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील हिचा गुरुवारी, अंधेरी पश्चिम येथील ॲक्सिस रुग्णालयात भूल दिल्याने मृत्यू झाला. कानाच्या शस्त्रक्रियेसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पाटील ही मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात तैनात होती. ती कांदिवली पूर्व येथील रहिवासी होत्री. गौरीचा भाऊ विनायक पाटील यांनी सांगितले की, गौरीला उजव्या कानात समस्या होती,  ती जेव्हाही काही थंड अन्न खात असे तेव्हा तिच्या कानात पाणी यायचे. म्हणून तिने ॲक्सिस हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनतर 28 ऑगस्टला डॉक्टरांनी तिला दाखल केले आणि 30 ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.

मात्र, 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता डॉक्टरांनी अचानक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि 15 ते 20 मिनिटांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. रात्री 8 च्या सुमारास कुटुंबियांना कळले नाही की, तिचे शरीर प्रतिसाद देत नाही. तिचा रक्तदाब कमी झाला, पण तिचे हृदय अजूनही धडधडत होते, म्हणून त्यांनी तिला आयसीयूमध्ये (इंटेसिव्ह केअर युनिट) हलवले. रात्री 9:50 वाजता, रुग्णालयाने सांगितले की तिचे निधन झाले आहे. (हेही वाचा: Mumbai Local Train Death: जीवघेणा लोकल प्रवास! 20 वर्षांत 51,000 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती)

त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आला. तिने उपचारासाठी ॲक्सिस हॉस्पिटल निवडले होते, कारण तिच्या दोन पोलीस मित्रांवर तेथे शस्त्रक्रिया झाल्या होत्या. गौरी अविवाहित असून ती कांदिवली पूर्व येथे आई-वडील आणि भावासोबत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रुग्णालय लोखंडवाला, अंधेरी पश्चिम येथे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2024 09:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).