Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर यांचे पार्थीव बोरिवली येथील निवासस्थानी दाखल
काल रात्री मुंबईतील दहिसर परिसरात त्यांची हत्या करण्यात आली.
शिवसेना (UBT) पक्षाचे नेते माजी नगरसेवक विनोद घोसाळकर यांचे पार्थीव मुंबई येथील बोरिवली परिसरातील त्यांच्या निवास्थानी आणण्यात आले आहे. काल रात्री मुंबईतील दहिसर परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे फेसबुक लाईव्ह सुरु असताना हल्लेखोराने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोरानेही आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, घोसाळकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवसेना (UBT) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे. त्यांचे कार्यकर्ते अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत.
व्हिडिओ