मुंबई- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस जानेवारी 2020 पासून प्रवाशांच्या सेवेत होणार रुजू; 'हे' आहे वेळापत्रक

देशातील पहिल्या वाहिल्या खासगी तेजस एक्सप्रेसची (Tejas Express) आता मुंबई- अहमदाबाद (Mumbai- Ahemdabad) ही नवी कोरी सेवा जानेवारी 2020 पासून सुरु होणार आहे.

Tejas Express (Photo Credits: ANI)

देशातील पहिल्या वाहिल्या खासगी तेजस एक्सप्रेसची (Tejas Express)  आता मुंबई- अहमदाबाद (Mumbai- Ahemdabad)  ही नवी कोरी सेवा जानेवारी 2020 पासून सुरु होणार आहे. ऑक्टोबर 2019 पासून दिल्ली ते लखनऊ (Delhi- Lucknow))  दरम्यान सुरू असणाऱ्या तेजस खाजगी एक्स्प्रेसच्या यशानंतर आता हा नवा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  ज्या कामाची पूर्ती होताच जानेवारी पासून ही सेवा सुरु होईल असे संकेत आहेत. तेजस एक्स्प्रेसचे तिकीट दर मात्र इतर एक्स्प्रेसच्या तुलनेने जास्त असतील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) च्या वतीने या दोन्ही खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येतील.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसची पहिली ट्रेन सकाळी 6.40 वाजता अहमदाबादहून सुटून दुपारी 1.10 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. मुंबई सेंट्रलहून दुपारी 3.40 वाजता सुटून अहमदाबाद येथे रात्री 9.55 वाजता पोहोचेल.आठवड्यातील गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी तेजस एक्स्प्रेस धावेल. (मार्च 2020 पासून पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस दर शनिवारी रद्द; दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय)

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस केवळ सुरत आणि वडोदरा स्थानकात थांबा घेणार आहे. प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था करण्यात आल्या असून यामध्ये वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा अशा सुविधा आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement