लवकरच मल्टीप्लेक्स सुरु होण्याची शक्यता; सॅनिटायझेशन साठी PVR Cinemas चा Dettol शी करार, 70 शहरांमधील 175 पीव्हीआर थिएटर्समध्ये होणार स्वच्छता

कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) मधून बहुतेक गोष्टींना आता सूट देण्यात आली आहे. यानंतर आता सरकार लवकरच थिएटर्स (Multiplex) उघडण्यास परवानगी देईल अशी अपेक्षा आहे. मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमाने (PVR Cinemas) प्रेक्षकांना हायजेनिक पद्धतीने चित्रपट पाहण्याचा अनुभव देण्यासाठी,

PVR Pictures Logo (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) मधून बहुतेक गोष्टींना आता सूट देण्यात आली आहे. यानंतर आता सरकार लवकरच थिएटर्स (Multiplex) उघडण्यास परवानगी देईल अशी अपेक्षा आहे. मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमाने (PVR Cinemas) प्रेक्षकांना हायजेनिक पद्धतीने चित्रपट पाहण्याचा अनुभव देण्यासाठी, रेकिट बेन्कीझरच्या लोकप्रिय सॅनिटायझेशन ब्रँड डेटॉल (Dettol) शी करार केला आहे, यावरूनही लवकरच मल्टीप्लेक्स उघडतील असा अंदाज आहे. पीव्हीआर सिनेमाने म्हटले आहे की, सरकारच्या मार्गदर्शक सूचना पाळून व त्यांची मान्यता घेऊन थिएटर्स उघडली जातील.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या भागीदारी कार्यक्रमांतर्गत 70 शहरांमधील 175 पीव्हीआर सिनेमामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्वच्छता आणि सेनिटायझिंग प्रोटोकॉल सुनिश्चित केला जाईल. आरबी हेल्थ दक्षिण आशियाचे मुख्य विपणन अधिकारी पंकज दुहान म्हणाले की, ‘पीव्हीआरबरोबर भागीदारी करून आम्ही चित्रपट प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट डेटॉल जंतू संरक्षण देऊ इच्छितो.’ पीव्हीआर सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौथम दत्ता म्हणाले की, ‘मल्टीप्लेक्स चेन गेल्या काही महिन्यांपासून विचार करत आहे की, चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना अधिक चांगले आणि सुरक्षित वातावरण कसे उपलब्ध करून देता येईल. आता आम्ही सर्व स्तरांवर सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी डेटॉलशी भागीदारी केली आहे.’

हायजीन प्रोटोकॉल, सोशल डिस्टेंसिंग आणि फूड सेफ्टी उपायांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असल्याचे, पीव्हीआर सिनेमाने म्हटले आहे. सर्व टचपॉईंट्सवर किमान मानवी संवाद साधला जाईल. सर्व कर्मचार्‍यांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जाईल. सर्व कर्मचारी पीपीई किट, मास्क, हातमोजे आणि अतिरिक्त संरक्षणासाठी फेस शिल्ड परिधान करतील, असेही पीव्हीआरने सांगितले आहे.

या व्यतिरिक्त, पीव्हीआरने सांगितले की संपूर्ण कॅम्पसमध्ये ईपीएद्वारे मंजूर केलेली यूएलव्ही स्वच्छता प्रक्रिया नियमित अंतराने पार पाडली जाईल. त्याअंतर्गत, इलेक्ट्रोस्टेटिक मशीनद्वारा पृष्ठभागावर अँटी-मायक्रोबियल लेयरची कोटिंग लावली जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement