Mukul Roy Returns to TMC: भाजपला धक्का; मुकुल रॉय यांची तृणमूल काँग्रेसमध्ये 'घरवापसी'
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आगोदरच कार्यालयात उपस्थित होत्या. तृणमूल काँग्रेस पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी काही वेळातच तिथे पोहोचले. ममता बॅनर्जी आणि मुकुल रॉय यांच्यात प्रदीर्घ काळ चर्चा झाली. त्यानंतर मुकुल रॉय यांचा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकी पूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या मुकुल रॉय (Mukul Roy) यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षात प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणखीही काही नेते पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मुकुल रॉय हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन टीएमसी (TMC) पक्षात जाणार याबाबत गेले अनेक दिवस चर्चा होती. अखेर ही चर्चा प्रत्यक्षात उतरली. मुकुल रॉय यांनी आज (शुक्रवार, 11 जुलै) वाजता तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मुकुल रॉय हे आपल्या घरुन दुपारी 3 वाजता तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात गेले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आगोदरच कार्यालयात उपस्थित होत्या. तृणमूल काँग्रेस पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी काही वेळातच तिथे पोहोचले. ममता बॅनर्जी आणि मुकुल रॉय यांच्यात प्रदीर्घ काळ चर्चा झाली. त्यानंतर मुकुल रॉय यांचा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. पक्ष प्रवेशानंतर मुकूल रॉय यांनी म्हटले की, 'मी भाजप सोडून टीएमसीमध्ये आलो आहे. सध्या बंगालमध्ये भाजप ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. तृणमूल काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये जाणारे पहिले नेता मुकुल रॉय आणि त्यांचे पूत्र शुभांशू आज पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतले. (हेही वाचा, Uttar Pradesh Elections 2022: उत्तर प्रदेशमध्ये असंतोष; योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक, 70 मिनट चर्चा)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुल रॉय हे पहिल्यांदा इमारतीच्या आपल्या त्या जुन्या खोलीत गेले जी त्यांनी 2017 मध्ये सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षात क्रमांक दोनचे नेता म्हणून ओळखले जाणारे मुकूर रॉय यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही काळ ते भाजपमध्ये राहिले. परंतू, त्यानंतर त्यांनी भाजपपासून काहीशी फारकत घेतली.
एएनआय ट्विट
पश्चिमबंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर मुकुल रॉय हे पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतू, या चर्चेला तेव्हा बळकटी मिळाली. जेव्हा टीएमसीचे प्रमुख नेते अभिषेक बॅनर्जी हे मुकुल रॉय यांना भेटम्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मुकुल रॉय यांची पत्नी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिषेक बॅनर्जी हे रुग्णालयात गेले होते. दरम्यान, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुकुल रॉय यांना फोन करुन त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.