MP Shocker: खंडवा जिल्ह्यात दुकानाच्या छतावर सापडला 13 वर्षीय मुलीचा मृतदेह; दुकानदाराला अटक

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून एका लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. एका 50 वर्षीय दुकानदाराने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह दुकानाच्या छतावर टाकला.

MP Shocker: खंडवा जिल्ह्यात दुकानाच्या छतावर सापडला 13 वर्षीय मुलीचा मृतदेह; दुकानदाराला अटक
Representational Image | (Photo Credits: IANS)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा (Khandwa) जिल्ह्यातून एका लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. एका 50 वर्षीय दुकानदाराने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह दुकानाच्या छतावर टाकला. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदाराला अटक केली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस मृत मुलीच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांकडेही चौकशी करत आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही मुलगी दुकानातून काही सामान आणण्यासाठी गेली होती. खूप वेळ झाला तरी ती परतली नाही. म्हणून दुकानाच्या आजूबाजूला तिचा शोध घेतला गेला. तेव्हा तिचा मृतदेह दुकानाच्या छतावर सापडला.

खंडवा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक सीमा अल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय किराणा दुकानदाराने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली आणि मृतदेह दुकानाच्या छतावर टाकून दिला. काल दुकानाच्या छतावर एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. बलात्कार करुन हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये विधवा महिलेवर निर्भयासारखे क्रौर्य; सामूहिक बलात्कारानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड)

ANI Tweet:

दरम्यान, मृत मुलीला तिथे बोलवण्यात आले होते की ती काही कामानिमित्त तेथे गेली होती, याची खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नाही. दुकानदाराला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर पोलिस पोलिस मृत मुलीच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांचीही चौकशी करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2021 02:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).