कोलकाता: आईने गाठला क्रुरतेचा कळस, 2 महिन्यांच्या मुलीची हत्या करुन मृतदेह मॅनहोलमध्ये टाकला

तिचा पती एका खासगी कार्यालयात नोकरी करतो. तिचे सासरे प्रमोटर आहेत. तिला 9 वर्षांचा मुलगाही आहे. संध्या हिच्या सासरच्या मंडळींचे म्हणने असे की, शायना (मृत मुलगी) हिचे आगमन झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. लवकरच मुलीचा नामकरण सोहळा आयोजित केला जाणार होता. दरम्यान, ही अप्रिय घटना घडली.

Sandhya Mallu | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोलकाता (Kolkata) येथील बेलियाघाटा (Beliaghata) पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली की, तिच्या 2 महिन्यांच्या मुलीची हत्या झाली आहे. पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आणि घटनेच्या मूळापर्यंत जाऊन चिमूकलीच्या मारेकऱ्याचा शोध घेतला. गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन खरा मारेकऱ्याची ओळख पटली तेव्हा पोलीसही हादरुन गेले. या मुलीची हत्या इतर कोणी नव्हे तर चक्क तिच्या जन्मदात्या आईनेच केली होती. धक्कादायक म्हणजे मुलीची हत्या करुन ही महिला चेहऱ्यावर साळसूद भाव घेऊन पोलिसांत गेली होती आणि तिने तक्रार दिली होती. पोलिसांनी या महिलेला बेड्या ठेकल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी महिलेचे नाव संध्या मालू तर मृत मुलीचे नाव शनाया मालू असे आहे. मनूष्यवध आणि मृतदेह गटारीत फेकणे, पुरावा नष्ट करणे या आरोपाखाली संध्या मालू हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, संध्या मालू हिने आपली 2 महिन्यांची मुलगी शनाया मालू हिची हत्या केली आणि ती राहात असलेल्या अपार्टमेंटखाली असलेल्या एका गटारीच्या मॅनहोलमध्ये तिचा मृतदेह टाकले. दरम्यान, तिने पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रारही दाखल केली.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत मालू हिने म्हटले होते की, दुपारी 12.30 ते 1 या कालावधीदरम्यान अज्ञात यूवकाने घराची बेल वाजवली. त्याने आपल्याला घराच्या छताचा दरवाजा उघडणारी किल्ली मागितली. आपण ती चावी देण्यासाठी वळलो असता त्याने आपल्याला मारहाण करत जोराचा धक्का दिला. ज्यामुळे आपण भिंतीवर आदळून बेशुद्ध झालो. आपण बेशुद्ध झाल्याचा गैरफायदा घेऊन या युवकाने आपल्या मुलीला घेऊन पळ काढला. ही घटना घडली तेव्हा मुलीला सांभाळणारी आया घराच्या छतावर होती. दरम्यान, आपले सासरे घरात आले. त्यांच्या सहाय्याने आपण पोलिसांत तक्रार दाखल करत असल्याचेही मालू हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि तपासास सुरुवात केली. पोलिसांनी हे कुटुंब राहात असलेल्या वसाहतीतील सर्व सदस्यांकडे चौकशी केली. दरम्यान, पोलिसांच्या ध्यानात आले की, तक्रारकर्त्या महिलेच्या शरीरावर अथवा चेहऱ्यावर जखमेची एकही खूण नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता मालू पोपटासारखी बोलू लागली. तिने गुन्हा कबूल केला. आपण आपल्या मुलीला कंटाळलो होतो. त्यामुळे आपण स्वत:च तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह गटारीच्या मॅनहोलमध्ये टाकल्याचे पोलिसांना सांगितले. (हेही वाचा, मुंबई: प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या 23 वर्षीय मुलीची आईनेच केली हत्या)

संध्या मालू ही सधन कुटुंबातील महिला आहे. तिचा पती एका खासगी कार्यालयात नोकरी करतो. तिचे सासरे प्रमोटर आहेत. तिला 9 वर्षांचा मुलगाही आहे. संध्या हिच्या सासरच्या मंडळींचे म्हणने असे की, शायना (मृत मुलगी) हिचे आगमन झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. लवकरच मुलीचा नामकरण सोहळा आयोजित केला जाणार होता. दरम्यान, ही अप्रिय घटना घडली.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी संध्या हिने दिलेल्या तक्रारीचाच संदर्भ घेत तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिसांनी तिला विचारले की, संबंधीत यूवकाने जर घराच्या छताची चावी मागितली असेल तर आपण सांगायला हवे होते की, छताचा दरवाजा उघडाच आहे. कारण, आया छतावरच होती. तसेच, युवकासोबत झालेल्या झटापटीत आपला चष्मा फुटला असता. इतकेच नव्हे तर भींतीवर डोके आपटून आपण बेशूद्ध झाला असता तर, आपल्या डोक्याला जबर दुखापत होणे अपेक्षीत होते. यातील काहीच घडले नाही. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नावर संध्या मालू निरुत्तर झाली आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला. संध्या हीला हे अपत्य नको होते त्यामुळे तीने ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



संबंधित बातम्या

COVID-19 Research साठी देहदान करणाऱ्या 93 वर्षीय Jyotsna Bose ठरल्या पहिल्या भारतीय महिला

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

कोलकाता: आईने गाठला क्रुरतेचा कळस, 2 महिन्यांच्या मुलीची हत्या करुन मृतदेह मॅनहोलमध्ये टाकला

Wayanad by-election Result: वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांचा मोठा विजय

Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड येथून Priyanka Gandhi Vadra आघाडीवर

Golden Chariot Luxury Tourist Train: भारतीय रेल्वे सुरु करणार 'सुवर्ण रथ लक्झरी पर्यटक ट्रेन'; मिळणार 7 स्टार हॉटेलसारख्या सुविधा, पाहू शकाल कर्नाटकच्या सांस्कृतिक वारशाची झलक

SC On Delhi Pollution: सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीतील प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी; दिल्ली सरकार आणि पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश