Most-Ordered Dish on Zomato in 2023: यंदा बिर्याणी ठरली झोमॅटोवर सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश, तर मुंबईमधील व्यक्ती ठरली सर्वात जास्त फूडी- Reports
मुंबईतील एका व्यक्तीने एका दिवसात 121 ऑर्डर देण्याचा विक्रम केला आहे. बेंगळुरूमधीलच अजून एका व्यक्तीने झोमॅटोद्वारे 6.6 लाख रुपयांच्या 1389 भेटवस्तू ऑर्डर केल्या होत्या.
यापूर्वी स्विगीने फूड ऑर्डर करण्याच्या ट्रेंडचा उल्लेख केला होता आणि आता झोमॅटोनेही (Zomato) आपल्या वार्षिक अहवालात या ट्रेंडचा उल्लेख केला आहे. झोमॅटोनुसार, अपेक्षेप्रमाणे, 2023 मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा फूड ऑर्डरिंगच्या ट्रेंडमध्ये अव्वल स्थानावर आहेत. लोकांनी 2023 मध्ये झोमॅटोकडून एकूण 10.09 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत आणि दुसरीकडे त्यांनी 7.45 कोटी पिझ्झा ऑर्डर केले.
2023 मध्ये झोमॅटोकडून ऑर्डर केलेल्या बिर्याणीने 8 कुतुबमिनार भरू शकतात. पिझ्झाविषयी बोलायचे झाले तर, त्यांची संख्या इतकी जास्त आहे की ते कोलकात्याच्या ईडन गार्डन क्रिकेट स्टेडियमइतके मोठे 5 स्टेडियम पूर्णपणे कव्हर करू शकतात. नूडल बाउल सर्वाधिक ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या यादीत तिसरे स्थान आहे.
झोमॅटोची सर्वात मोठी ऑर्डर बेंगळुरू येथून आली, जिथे एका व्यक्तीने 46,273 रुपयांची एक ऑर्डर दिली. मुंबईतील एका व्यक्तीने एका दिवसात 121 ऑर्डर देण्याचा विक्रम केला आहे. बेंगळुरूमधीलच अजून एका व्यक्तीने झोमॅटोद्वारे 6.6 लाख रुपयांच्या 1389 भेटवस्तू ऑर्डर केल्या होत्या. झोमॅटोने मुंबईतील हानिस नावाच्या व्यक्तीला देशात सर्वात जास्त खाद्यपदार्थ दिले आहे. या व्यक्तीने 2023 मध्ये एकूण 3580 ऑर्डर दिल्या, जे दररोज सरासरी 9 ऑर्डर होते. (हेही वाचा: Swiggy Instamart: कंडोम, कांदे, मखाना... 2023 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त ऑर्डर केल्या 'या' गोष्टी; स्विगी इंस्टामार्टने जारी केला रिपोर्ट)
2023 मध्ये बेंगळुरूमध्ये झोमॅटोवर सर्वाधिक नाश्त्याच्या ऑर्डर देण्यात आल्या, तर दिल्लीमध्ये रात्री उशिरा सर्वाधिक ऑर्डर देण्यात आल्या. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोला केवळ 2 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याबाबत कौतुकासोबतच सोशल मीडियावर जोक्सही केले जात होते. पण तो विनोद झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी सकारात्मक घेतले. कारण त्यांना माहित होते की, ही फक्त सुरुवात आहे, कंपनी प्रथमच तोट्यातून नफ्यात वळली होती. नफा केवळ दोन कोटी रुपये असला तरी कंपनीचा उत्साह वाढवण्यासाठी पुरेसा होता.