BSF Personnel Injured in Mortar Explosion: पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोर्टार बॉम्बचा स्फोट; बीएसएफचे 3 जवान जखमी

जखमी चार जवानांना तातडीने पोखरणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

BSF Personnel Injured in Mortar Explosion (फोटो सौजन्य - X/@ians_india)

BSF Personnel Injured in Mortar Explosion: जैसलमेरच्या पोखरण (Pokhran) येथील फील्ड फायरिंग रेंज (Field Firing Range) मध्ये शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. बीएसएफ (Border Security Force) जवानांसोबतच्या सरावादरम्यान मोर्टार बॉम्बचा स्फोट होऊन चार जवान जखमी झाले. जखमी चार जवानांना तातडीने पोखरणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर बीएसएफचे अधिकारी आणि इतर जवान घटनास्थळी पोहोचले.

यातील दोन जवानांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही सैनिक बीएसएफचे प्रशिक्षणार्थी होते आणि नियमित सराव सत्रादरम्यान हा अपघात झाला. जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. उदय, सुविमल आणि अभिषेक अशी जखमी जवानांची नावे आहेत. (हेही वाचा -Lebanon Pager Explosion: लेबननमध्ये पेजरमध्ये बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू तर 2750 जखमी)

पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोर्टार बॉम्बचा स्फोट; बीएसएफचे 3 जवान जखमी - 

जैसलमेरच्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये असे अपघात क्वचितच घडतात. परंतु या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षा मानकांची चर्चा होत आहे. अपघाताचे खरे कारण शोधून काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.