Monsoon Session 2022 of Parliament: मोदी सरकारला शब्दांचे वावडे; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'जुमलाजीवी', 'हुकुमशाह', 'बाल बुद्धी', 'कोविड स्प्रेडर' शब्द वापरावर बंदी, असंसदीय शब्दांची यादी जाहीर
कोरोना स्प्रेडर (Corona spreader) हुकुमशाह, हुकुमशाही, जयचंद (Jaichand), विनाश पुरुष, जुमलाजीवी (Jumlajeevi) यांसारख्या इतरही काही शब्दांचा वापर संसदेमध्ये करणे असंसदीय ठरणार आहेत.
Monsoon Session 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप (BJP) प्रणीत एनडीए (NDA) सरकारला काही शब्दांचे चांगलेच वावडे आहे. त्यामुळे सरकारने अशा काही शब्दांची यादी करुन ते शब्द संसदेच्या आगामी पावासाळी अधिवेशनात वापरण्यास बंदी घातली आहे. याबाबत संसदेच्या सचिवालयाने एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे. या पत्रकानुसार हे शब्द असंसदीय (Unparliamentary Words) असणार आहेत. सत्ताधारी अथवा विरोधकांपैकी एखाद्या सदस्याने हे शब्द वापरले तर ते संसदेच्या पटलावरुन काढून टाकले जाणार आहेत. कोरोना स्प्रेडर (Corona spreader) हुकुमशाह, हुकुमशाही, जयचंद (Jaichand), विनाश पुरुष, जुमलाजीवी (Jumlajeevi) यांसारख्या इतरही काही शब्दांचा वापर करणे असंसदीय ठरणार आहेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरु होत आहे. या अधिवेशनापासून शब्दांच्या बाबतीत हा नियम लागू असणार आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका बुकलेटमध्ये म्हले आहे की, 'जुमलाजीवी', 'बाल बुद्धी', 'कोविड स्प्रेडर' आणि 'स्नूपगेट' यांसारख्या शब्दांना संसदीय कामकाजात स्थान असणार नाही. विशेष म्हणजे या शब्दांमध्ये अशा काही शब्दांचा समावेश आहे जे शब्द सर्वसामान्य जीवनात राजरोसपणे वापरले जातात. यात काही इंग्रजी शब्दांचाही समावेस आहे. जसे की, 'Ashamed', 'Abused, 'Betrayed', 'Corrupt', 'Drama', 'Hypocrisy' आणि 'Incompetent' वगैरे..वगैरे. उल्लेखनीय म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा असे संसदेच्या दोन्ही सभागृहात हे शब्द वापरता येणार नाहीत. (हेही वाचा, Maharashtra Monsoon Assembly Session 2021: तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्यासह 12 भाजपा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन)
लोकससभा सचिवालयाने असंसदीय मानलेले शब्द
हिंदी- शकुनि, तानाशाह, तानाशाही, जयचंद, विनाश पुरुष, खालिस्तानी, खून से खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, उनमें, गद्दार, गिरगिट, घडियाली आंसू, अपमान, असत्य, अहंकार, करप्ट, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागिरी, बेचारा, बॉबकट, लॉलीपॉप, विश्वासघात, संवदेनही, मूर्ख, पिट्टठू, सेक्सुअल हॉरसमेंट
इंग्रजी- Anarchist, Dictatorial, Ashamed, Abused, Betrayed, Corrupt, Drama, Hypocrisy, Incompetent, Bloodshed, Bloody, Betrayed, Ashamed, Abused, Cheated, Chamcha, Chamchagiri, Chelas, Childishness, Corrupt, Coward, Criminal, Crocodile Tears, Disgrace, Donkey, Drama, Eyewash, Fudge, Hooliganism, Hypocrisy, Incompetent, Mislead, Lie, Untrue.
दरम्यान, सचिवालयाकडून असंसदीय ठरवलेले शब्द आणि भवना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकायच्या की कायम ठेवायचे याचे अंतिम राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे कायम असतील. सचिवालयाने म्हटले आहे की, यातील काही शब्द असे असतात की ते तोपर्यंत असंसदीय वाटत नाहीत. जोपर्यंत ते ससदेत संबोधीत केलेल्या इतर संबोधनाशी ताडून पाहिले जात नाहीत.