Budget 2020: आगामी अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना मिळू शकते मोठी खूषखबर; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची शक्यता

मागील अर्थसंकल्पामध्ये आयकराच्या स्लॅबमध्ये कोणतेच बदल करण्यात आले नव्हते.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Union Budget 2020:  देशामध्ये आर्थिक मंदी रोखण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान येत्या 1 फेब्रुवारी 2020 दिवशी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2020) मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान करदात्यांसाठी एक मोठी बातमी म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आयकराच्या कपातीची मागणी जोर धरत आहे. सरकारकडून आयकरामध्ये बदल करून नवे आयकराचे स्लॅब्स (Income Tax Slab) जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून अधिक उत्पन्न असणार्‍या वेतनधारकांसाठी नवे स्लॅब जाहीर करण्याची शक्यता दाट आहे. मागील अर्थसंकल्पामध्ये आयकराच्या स्लॅबमध्ये कोणतेच बदल करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता कर कपात होण्याची शक्यता अधिक आहे.

सध्या करकपात करून त्याचा अर्थव्यवस्थेवर कितपत परिणाम होणार आहे? हे पाहून त्याचा पुढील निर्णय घेतला जाईल असे काही मीडिया रिपोर्ट्समधून पुढे आले आहे. दरम्यान 31 जानेवारी दिवशी यंदाचा इकॉनॉमिक सर्व्हे जाहीर होण्याची शक्यता आहे.

सध्या काय आहे इन्कम टॅक्स स्लॅब?

सध्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे वार्षिक 2.50 लाखांचे उत्पन्न करमुक्त आहे. 2.50 लाख ते 5 लाख उत्पन्नावर 5% टॅक्स, 5 लाख ते 10 लाख उत्पन्नावर 20% टॅक्स आहे. तर 10 लाखांहून अधिक कमाई करणाऱ्यांना 30% टॅक्स आकारला जातो. यासोबत 50 लाखांहून जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार 10-37% सरचार्ज आहे.

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होऊ शकतात?

दरम्यान नव्य इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 10 लाखांचे वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना 10% थेट टॅक्स लावला जाईल. तर 10-20 लाख उत्पन्नावर 20% आणि 20 लाख ते 2 कोटी वार्षिक उत्पन्नावर 30% टॅक्स आहे. तर वार्षिक उत्पन्न 2 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍यांना 35% टॅक्स अशी शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान करमुक्त उत्पन्न मर्यादेत अद्याप कोणतेच बदल सुचवण्यात आलेले नाहीत.