मॉब लिंचिंग विरुद्ध नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा मागे

देशातील मॉब लिंचिंग प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी एकवटलेल्या 50 जणांवर मुझफ्फरपूरच्या पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा देशद्रोहाचा होता. मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे.

Konkona Sen, Anurag Kashyap, Mani Ratnam (Photo Credits: Instagram)

देशातील मॉब लिंचिंग प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी एकवटलेल्या 50 जणांवर मुझफ्फरपूरच्या पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा देशद्रोहाचा (Sedition) होता. मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे. अनुराग कश्यप, मणि रत्नम, अपर्णा सेन अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. बॉलिवूडसह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी नरेंद्र मोदी यांना याप्रकरणी पत्र लिहले होते. मात्र सार्‍यावर FIR दाखल करत देशद्रोहाचा आरोप लावल्याने प्रशासनावर टीका करण्यात आली होती. मॉब लिंचिंग विरुद्ध नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींची तक्रार सरकारने केलेली नाही- प्रकाश जावडेकर

मुझफ्फरमधील स्थानिक वकील सुधीर कुमार ओझा यांनी काही महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी सुनावणी दरम्यान आदेश दिल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारत देशाचे संविधान हे भारताला धर्मनिरपेक्ष देश असल्याचे सांगते. भारतामध्ये प्रत्येक धर्म, समाज, लिंग, जाती आदिंना एकसमान अधिकार आहे. दलित, मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक समाजाविरोधात होणारी लिंचिंग रोखणे आवश्यक आहे. अशा आशयाचं पत्र सार्‍यांनी मिळून मोदींना पाठवले होते.

गुन्ह्यात देशद्रोह, सार्वजनिक ठिकाणी चुकीची माहिती पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे, तसेच शांतता भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही सुधीर ओझा यांनी म्हटले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement