मालदीवने ताब्यात घेतलेल्या 12 भारतीय मच्छिमारांची सुटका करावी; एमके स्टॅलिनची केंद्राला विनंती
तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातून 1 ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी निघालेल्या मच्छिमारांना 23 ऑक्टोबर रोजी मालदिव तटरक्षक दलाकडून ताब्यात घेण्यात आले होते
तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Tamil Nadu Chief Minister) एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी शनिवारी केंद्रीय परराष्ट्र मंत्री (Union Minister of External Affairs) डॉ. एस जयशंकर (Dr S Jaishankar) यांना पत्र लिहून मालदीव तटरक्षक दलाने (Maldives Coast Guard) ताब्यात घेतलेल्या 12 मच्छिमारांची आणि त्यांच्या मासेमारी बोटीची सुटका करण्याची विनंती केली. पत्रात स्टॅलिन यांनी नमूद केले की, मच्छिमारांना 23 ऑक्टोबर रोजी थुथुकुडी जिल्ह्यातून 1 ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी निघाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि जयशंकर यांना त्यांची सुटका करण्यासाठी मालदीव अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण उचलण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा - Landslide in Arunachal Pradesh: बांधकामाधीन धरणावर भूस्खलन झाल्याने जलविद्युत प्रकल्पावर परिणाम, सुबनसिरी नदीतील पाण्याचा प्रवाह झाला कमी (Watch Video))
स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात लिहले आहे की “मालदीव तटरक्षक दलाने 23.10.2023 रोजी तामिळनाडूच्या 12 मच्छिमारांना अटक केल्याकडे मी तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो, मच्छिमारांनी 01.10.2023 रोजी थारुवैकुलम फिश लँडिंग सेंटर, थुथुकुडी जिल्ह्यातील, नोंदणी क्रमांक IND–TN–12–MM-6376 असलेल्या यांत्रिक मासेमारी बोटीमधून मासेमारीसाठी गेले होते, त्यांना 23.10.2023 रोजी थिनाधू बेट जवळ मालदीव तटरक्षक दलाने अटक केल्याचे वृत्त आहे. या संदर्भात, ताब्यात घेतलेल्या मच्छिमारांची आणि त्यांच्या मासेमारी बोटीची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी योग्य मुत्सद्दी माध्यमांद्वारे हे प्रकरण मालदीव अधिकार्यांकडे मांडावे, अशी मी तुम्हाला विनंती करतो,”