#MeToo: 'माझी संमती नव्हतीच, एम. जे. अकबर यांनीच बलात्कार केला'; महिला पत्रकार आरोपावर ठाम
#MeToo मोहिमेच्या माध्यमातून सुरु झालेल्या माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या फैरी काही कमी होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस त्यात भरच पडताना दिसत आहे. त्यामुळे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.
अकबर यांच्यासोबतच्या संबंधांना माझी कोणतीही मान्यता नव्हती. त्यांनीच माझ्यावर बलात्कार केला असे, सांगत अमेरिकास्थित महिला पत्रकार आपल्या आरोपांवर ठाम आहे. माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा या महिला पत्रकाराने केला होता. त्यावर हा बलात्कार नव्हता. तर, परस्परसंमतीने ठेवलेले शरीरसंबंध होते. जे काहीच महिने टिकले, असा दावा अकबर यांनी केला होता.
अकबर यांच्यावर आरोप करणारी महिला पत्रकार अमेरिकेतील एका नामवंत प्रसारमाध्यम समूहात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. 'एशियन एज' या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता. हा बलात्कार त्यांनी जयपूर येथील हॉटेलच्या एका खोलीत केला, असा आरोप या महिला पत्रकाराने केला होता. त्यावर ‘1994च्या काळी आमच्यात संबंध होते, परस्परसंमतीने आम्ही एकत्र होतो. मात्र नंतर हे नाते संपले’, असे स्पष्टीकरण अकबर यांनी दिले. मात्र, हा वाद इथेच थांबला नाही. आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये या पत्रकाराने आपण आपल्या आरोपांवर ठाम आहोत. अकबर हे खोटे बोलत आहेत. ज्या महिलांना अकबर यांच्या अशा वागण्याचा अनुभव आला आहे, त्यांनी पुढे यावे असे अवाहनही या महिला पत्रकाराने केले आहे. (हेही वाचा, #MeToo : छे...छे.. तो बलात्कार नव्हे, ते तर परस्परसंमतीचे संबंध - एम. जे. अकबर यांचा दावा)
महिला पत्रकारने ट्विटमध्ये काय म्हटले आहे ?
- 'एशियन एज' या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार.
- हे शरीरसंबंध म्हणजे सहमती नव्हती तो बलात्कारच होता .
- बळाचा आणि पदाचा गैरवापर करत एम. जे अकबर यांनी माझ्यावर बलात्कारच केला .
- मी एशियन एजमध्ये काम करत असताना एम जे अकबर यांनी माझा शारिरीक, मानसिक छळ केला.
- ते मला शिव्याही द्यायचे .
- माझ्यावर बलात्कार केला हे सत्य अकबर नाकारत आहेत.
- सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते अशी कबुली अकबर यांनी दिली मात्र त्यात काहीही तथ्य नाही.
- मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे.
- एम. जे अकबर यांनी पदाचा गैरवापर करून माझ्यावर बलात्कारच केला हे मी कालही म्हटले होते आणि आजही तेच म्हणते आहे.
- मी माझ्या ट्विटर अकाऊंटवर आणि सोशल मीडियावर जे मांडले आहे त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2018 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

